ETV Bharat / city

Corona: व्यंगचित्रकार करताहेत कोरोनासंदर्भात जनजागृती

व्यंगचित्र हे केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर समाजहितासाठीही असते. लोकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधन करणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे हेसुद्धा व्यंगचित्रकाराचे काम असते, या भावनेतून व्यंगचित्रकार काम करत आहेत.

cartoonist create awareness by cartoon
Corona: व्यंगचित्रकार करताहेत कोरोनासंदर्भात जनजागृती
author img

By

Published : Apr 18, 2020, 11:30 AM IST

Updated : Apr 18, 2020, 1:01 PM IST

पुणे- कोरोना विषाणू विषयी शासनातर्फे विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. जनजागृतीसाठी व्यंगचित्रकार देखील पुढे आले आहेत. तरुण आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार यामध्ये सहभागी झाले आहेत त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय.

Corona: व्यंगचित्रकार करताहेत कोरो

घराबाहेर कोरोना विषाणूसारखी दिसणारी रांगोळी काढल्यामुळे घरात न येणारी माणसे, कोरोनाच्या संघर्षामध्ये सर्वसामान्यांसाठी काम करणार्‍यांची आपुलकीने विचारपूस करणारा आणि त्यांचे धन्यवाद मानणारा आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन, सामाजिक जाणीव न ठेवता रस्त्यावरून कुत्र्यांसोबत मॉर्निंग वॉक करणारी गाढवाच्या डोक्याची माणसे अशा एकाहून एक नवनवीन कल्पना आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून कागदावर उतरवून शहरातील अनेक व्यंगचित्रकार कोरोनासंदर्भात जनजागृती करीत आहेत. घरात राहून हे कलाकार अप्रत्यक्षपणे कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये सहभागी झाले आहेत. व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, विश्वास सूर्यवंशी, रवि राणे, योगेश चव्हाण, धनराज गरड यांच्यासह अनेक तरुण आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार यामध्ये सहभागी झाले.

कोरोना हे केवळ महाराष्ट्र किंवा देशावर आलेले संकट नाही, तर जगावर आलेले संकट आहे. व्यंगचित्र हे केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर समाजहितासाठीही असते. लोकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधन करणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे हेसुद्धा व्यंगचित्रकाराचे काम असते. ही भावना मनात ठेवून आम्ही व्यंगचित्रकारांनी या संकटामध्ये आपल्या कलेच्या माध्यमातून यामध्ये सहभागी होण्याचे ठरविले, असे धनराज गरड यांनी सांगितले.

अनेक व्यंगचित्रकार कोरोनासंदर्भात कशाप्रकारची खबरदारी घेतली पाहिजे, कोरोनाची लक्षणे काय आहेत, कोरोनाचे संकट टाळण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी कशाप्रकारे काम करीत आहेत, याची माहिती देतानाच कोरोनासंदर्भात घडलेल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सामाजिक आणि राजकीय घटनांवर मिश्किल शेरेबाजी करीत व्यंगचित्रकार आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून या लढ्यामध्ये सहभागी झाले आहेत. अशी माहिती व्यंगचित्रकार धनराज गरड यांनी दिली

Last Updated : Apr 18, 2020, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.