ETV Bharat / city

The Student Bus Overturned : नाशिकमध्ये कॉलेजचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात, सुमारे 17 विद्यार्थी जखमी - undefined

नाशिकमध्ये कॉलेजचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात

author img

By

Published : Feb 4, 2022, 9:15 AM IST

Updated : Feb 4, 2022, 12:19 PM IST

09:08 February 04

नाशिकमध्ये कॉलेजचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात, सुमारे 17 विद्यार्थी जखमी

व्हिडिओ

नाशिक - नागपूर-औरंगाबाद रोडवर एसएमबीटी मेडिकल कॉलेजच्या स्टाफ बसचा भीषण अपघात झाला. शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस टर्न मारताना पलटी झाली. (The Student Bus Overturned) अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, १० किरकोळ जखमी झाले आहेत.

बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी

जखमी रुग्णांवर खाजगी आणि पालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे. (A bus carrying college students crashed) त्यात सहाजण गंभीर जखमी असून कुणाचा हात तर कुणाचा पायाला इजा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एसएमबीटी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांना घेऊन महाविद्यालयाची (एम.एच १५ ईएफ २५२६) ही बस औरंगाबाद रोड सिन्नरकडे जात असताना हॉटेल मिरची येथील वळणावरती बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली आहे.

चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ

बस पलटी होता समजताच चौकातील व्यापारी आणि स्थानिक नागरीकांनी कर्मचाऱ्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात तसेच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले सकाळच्या वेळी रहदारी कमी असली म्हणून मोठा अनर्थ टळला आहे. या चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने नेहमीच इथे अपघात होत असतात. त्यामुळे येथे गतीरोधकची मागणी वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी केली होती परंतु अद्यापही इथे गती रोधक बसवण्यात आला नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणी आडगाव पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा - 'एक दुआ-सलाम तहज़ीब के नाम', अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी आमने-सामने; कार्यकर्त्यांचा जल्लोष

Last Updated : Feb 4, 2022, 12:19 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.