पुणे - पुण्यातील एका तरुणाला सोशल मीडियावरील ओळख चांगलीच महागात पडली आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एका महिलेने तरुणाकडून तब्बल ६७ लाख रुपये उकळले आहे. याप्रकरणी तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार चेतन रवींद्र हिंगमारे (रा. कालेपडळ, हडपसर), निखिल उर्फ गौरव म्हेत्रे (२७, गाडीतळ, हडपसर) आणि एक तरूणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तिघांनाही अटक करण्यात आली ( boy filed case kondhwa police station of honey trap ) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तरुणीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. या दोघांमध्ये झालेली ओळख शरीर संबंधापर्यंत पोहचली. त्यातूनच त्या दोघांची जवळीक वाढली. त्यानंतर ती तरुणी तरुणाला ब्लॅकमेल करत होती. त्या तरुणीने तिच्या २ साथीदारांसह फिर्यादीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. अल्पवयीन असून बलात्कार केला आहे. यातून गर्भधारणा झाली आहे, असं सांगत तरुणाला धमकी दिली. प्रकरण मिटवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील म्हणून त्या तरुणीने ६७ लाख रुपयांची मागणी केली.
समाजात बदनामी होऊ नये यासाठी त्या तरुणाने ६७ लाख रुपये त्या तरुणीला दिले. मात्र, त्या तरुणीने आधिक पैसे मागायला सुरुवात केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या तरुणाने गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे.
हेही वाचा - Murder Near Shiv Sena Branch : शिवसेना शाखेसमोर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर.. सीसीटीव्हीत थरार कैद