पुणे - भाजपा हे सॉफ्ट टार्गेट झाला असून काहीही झाले की भाजपाचे नाव पुढे येत आहे. अमरावतीमध्ये कालच्या बंद(Amravati violence)मध्ये भाजपाचा हात नाही पण असेल तर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. तर मग परवाच्या तोडाफोडीत कोणाचा हात होता, हे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट करावे. जर त्यातही आमचा हात असेल तर आमचा हात खूपच स्ट्राँग आहे. त्रिपुरामध्ये घटना घडली की नाही हे कोणालाच माहीत नाही. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याची प्रतिक्रिया अमरावती, मालेगावमध्ये उमटली. पण त्यातही उपोषण नाही, निदर्शने नाही. 10 ते 15 हजार लोक रस्त्यावर उतरायची आणि माजी मंत्र्यांची कार्यालये फोडायची. काय संबंध आहे? कालच्या आंदोलनात भाजपाचा हात असेल तर परवाच्या आंदोलनात संजय राऊत यांचा हात आहे का? कालची प्रतिक्रिया ही हिंदू मार नही खायेगा ही स्वाभाविकच प्रतिक्रिया होती, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केली आहे.
'खऱ्या खऱ्या अटक करा, लुंगीसुंगीला अटक करू नका'
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी जर अशी बोटचेपी भूमिका घेतली असती तर 93च्या दंगलीत हिंदू जिवंत राहिला नसता. हे मी भाजपाचा अध्यक्ष म्हणून जाहीर करेल, की 93च्या दंगलीत जर बाळासाहेबांनी हिंदूंना प्रोत्साहन दिले नसते तर मुंबईत हिंदु शिल्लक राहिले नसते. त्या शिवसेनेचे वारसदार परवा झालेल्या घटनेवर काही बोलत नसतील, तर शोक आहे. काल झालेल्या घटनेवरून जर धरपकड केली असेल तर आमचे म्हणणे आहे, की परवा झालेल्या प्रकारातील दोषींना खऱ्या खऱ्या अटक करा, लुंगीसुंगीला अटक करू नका, असे पाटील म्हणाले.
'सरकारला संवेदशीलता राहिलेली नाही'
या सरकारला संवेदनशीलता राहिलेली नाही. अक्षरशः हा एस टी कर्मचाऱ्यांची घरे ही उद्ध्वस्त झाली आहेत. तरीही हे प्रतिष्ठेचा विषय करून बसले आहेत. सरकारी कर्मचारी करायला काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सवलती देण्यात याव्यात.