पुणे - भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील आरोप प्रत्यारोपात गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांच्यावर थेट आरोप केले आहे. एकनाथ खडसे म्हणाले की मी पक्षाला मोठे केले, मात्र प्रत्यक्षात ते स्वतः साधे ग्रामपंचायतीत देखील निवडुन येत नाहीत. आधी निवडून या आणि मग मोठेपणाच्या बाता मारा, शिवाय एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले ( Eknath Khadse mental balance deteriorated ) असल्याचा टोला भाजपा नेते गिरीश महाजन ( BJP leader Girish Mahajan ) यांनी लगावला आहे.
'राजकीय स्वार्थ साधायचा हा महाआघाडी सरकारचा कांगावा' : राज्यात विजेची समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा हा महाआघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीजटंचाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. शेतकऱ्याला कर्जबाजारी करून त्याच्या कर्जमुक्तीच्या कागदी घोषणा करण्याचे व त्याचे खोटे श्रेय घेण्याचे प्रकार याआधी उघडकीस आले आहे. वीजटंचाईमुळे हैराण झालेला शेतकरी व सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप गिरीश महाजनांनी केला आहे.
'सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी' : केंद्र सरकारने वीजखरेदीच्या दरावर मर्यादा घातल्याने हितसंबंधीयांचा जळफळाट सुरू असून दलालीतील टक्केवारी घटल्यामुळे अधिकाधिक वीज खासगी स्रोतांकडून खरेदी करण्याकरिता वीजटंचाई भासवून सामान्य जनता, उद्योगक्षेत्र आणि शेतकऱ्यास वेठीला धरले जात आहे, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. कोळशाअभावी वीजटंचाई झाल्याचे कारण देणाऱ्या सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी, अशी मागणीही महाजनांनी केली आहे.