ETV Bharat / city

भाजपची 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

PFI या संस्थेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केलेल्या कारवाई विरोधात पुणे शहर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. (Popular Front of India) तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी ६० ते ७० जणांचा बेकायदेशीर जमाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनधिकृतपणे जमा झाला होता. या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Sep 25, 2022, 5:48 PM IST

पुणे - पुण्यासह राज्यभरात एनआयए कडून छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)च्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात दोन दिवसांपुर्वी पॉप्युलर फ्रंटच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधासह, पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. ( Popular Front of India Protests in Pune ) या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणता व्हायरल झाला. तसा सर्वच स्तारातून संताप व्यक्त होऊ लागला. या आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करू लागले. मनसे प्रमुख यांनीही ट्विट करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही संस्था, भाजप तसेच शहरातील सुमारे 27 सामाजिक संस्थांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.

शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक माध्यमांशी बोलताना

दोन दिवसांत कठोर पाऊल उचलणार - कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे, देशाच्या विविध भागांत अंतर्गत जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडविण्याच्या या जमावाचा उद्देश असल्याचे स्पष्ट होते. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या सर्व कार्यकत्यांवर तातडीने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्या संघटनेवर बंदी घालावी. तसेच, कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील यावेळी मुळीक यांनी केली आहे. यावेळी पोलीस आयुक्तांना आम्ही जी मागणी केली आहे. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत कठोर पाऊल उचलून त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करतील असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले असल्याचे यावेळी मुळीक म्हणाले आहेत.

व्हिडियोचे फॉरेन्सिक करू - सध्या सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. तपासात ज्या गोष्टी निष्पन्न होतील. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. व्हिडियोचे फॉरेन्सिक करून घेण्यात येणार आहे. पोलिसांची हीच भूमिका आहे की यात जे जे समोर येईल त्यानुसार कडक पाऊले उचलली जाणार आहेत. अशी माहिती यावेळी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन - पुण्यासह राज्यभरात एनआयएनएने छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. याच्या निषेधार्थ काल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आल्याची तक्रार केली आहे. तसेच नितेश राणे यांनी या प्रकरणी चुन चुन के मारेंगे असे ट्विट केले आहे. त्यामुळे हा मोर्चा आता वादामध्ये सापडलेला असल्याचे पहायला मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.