पुणे - भगवान शिवाने सर्व शत्रूंवर विजय मिळाल्याचा विजय दिन म्हणजे महाशिवरात्र. प्रत्येक महिन्यात अमावस्येच्या अगोदरचा दिवस आणि रात्र यास शिवरात्र म्हणतात. संपूर्ण वर्षात अशा बारा शिवरात्री येतात. या बारा शिवरात्रींपैकी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील माघ व 14 शिवरात्रीला महाशिवरात्र म्हणतात. या महाशिवरात्री पृथ्वीचा उत्तर गोलार्ध असा स्थित असतो की नैसर्गिकरित्या मानवी शरीरातील उर्जेचा ऊर्ध्वदिशेने संचार होऊ लागतो. या निसर्गनिर्मित आनंदाची अनुभूती घेण्याची सुवर्णसंधी म्हणजेच ही महाशिवरात्र असल्याचे पुण्यातील वासुदेव निवास येथील भागवताचार्य शरद शास्त्री जोशी यांनी म्हटले आहे.
विशेष रात्र
ही महाशिवरात्र केवळ जागरणाची नव्हे तर जागृतीची रात्र म्हणजेच शिव व प्रकाशाचा अनुभव घेण्याची रात्र असल्याचे शरद शास्त्री जोशी सांगतात. आपल्याला सर्व सृष्टी सर्व तारकापुंज सौरमंडल ही दृष्टीस पडते. परंतु या सर्व ब्रह्मांडाला व्यवस्थित धरून ठेवणारी पोकळी दृष्टीस पडत नाही. म्हणजे सिया अनंत अवकाश किंवा असीमित पोकळीला शिवम म्हणतात. सर्व ऋषींनी शिवाला आदिगुरू म्हणून पाहिले आहे महाशिवरात्र म्हणजे शिवाची विशेष कृपा प्राप्त करून घेण्याची विशेष रात्र असल्याचे जोशी सांगतात.