ETV Bharat / city

'हे' आहेत संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे महाराष्ट्रातील खासदार - MP Amol Kolhe

खासदारांनी एका वर्षात काय काम केले, याचा लेखाजोखा असलेले खासदार रिपोर्टकार्ड पुण्यातील परिवर्तन या सामाजिक संस्थेकडून तयार केले जाते. लोकसभेतील सर्वच ५४३ खासदारांच्या कामाचे रिपोर्टकार्ड यंदा या संस्थेने तयार केले आहे. देशातील सर्वाााधक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या 5 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचा तर धुळ्याचे भाजपा खासदार सुभाष भामरे यांचा समावेश आहे.

best performer mp in parliament
संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे महाराष्ट्रातील खासदार
author img

By

Published : Jun 22, 2020, 3:46 PM IST

पुणे - लोकसभेच्या 3 अधिवेशनात 85 दिवस कामकाज झाले आहे. या काळात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या देशभरातील पहिल्या पाच खासदारांमध्ये महाराष्ट्रातील 3 खासदारांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील 26 खासदारांची या काळात शंभर टक्के उपस्थिती होती. पुण्यातील परिवर्तन या संस्थेने खासदार रिपोर्टकार्ड तयार केले, त्यात ही बाब समोर आली आहे.

देशभरातील खासदारांनी एका वर्षात काय काम केले, याचा लेखाजोखा असलेले खासदार रिपोर्टकार्ड पुण्यातील परिवर्तन या सामाजिक संस्थेकडून तयार केले जाते. देशातील सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या 5 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचा तर धुळ्याचे भाजपा खासदार सुभाष भामरे यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारले. तर अमोल कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचा विचार केल्यास पहिल्या पाचमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, सुभाष भामरे यांच्या सोबत शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि मुबई उत्तर-पश्चिमचे शिवसेना खासदार अरविद सावंत यांचा समावेश आहे.

लोकसभेत सर्वाधिक स्वतंत्र विधेयक मांडणाऱ्या पहिल्या पाच खासदारांमध्ये भाजपाचे मुंबई-उत्तरचे खासदार गोपाळ शेट्टी पहिल्या क्रमांकावर आहेत. या रिपोर्टकार्डनुसार एकूण 85 खासदारांनी गेल्या एक वर्षात एक ही प्रश्न विचारलेला नाही. यात महाराष्ट्रातील 4 खासदार आहेत. तर एकूण 17 खासदारांनी एकाही चर्चेत सहभाग घेतला नाही. यात महाराष्ट्रतील 2 खासदार आहे. तसेच विधेयक न मांडणाऱ्या 506 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील 42 खासदार आहेत.

best performer mp in parliament
रिपोर्टकार्ड तयार करणाऱ्या परिवर्तन या सामाजिक संस्थेचे सदस्य

खासदारांचे हे रिपोर्टकार्ड तयार करताना खासदारांची लोकसभेतील एकूण उपस्थिती, खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या, लोकसभेतील विविध विषयांवरील चर्चेत सहभाग, खासदारांनी मांडलेली वैयक्तिक विधेयके आणि खासदारांनी वापरलेला निधी या पाच निकषांचा अभ्यास करण्यात येतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.