ETV Bharat / city

Bacchu Kadu slammed MH governor : राज्यपालांनी मूर्खपणा केला- बच्चू कडू संतापले

राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, ( Bacchu Kadu slammed governor Koshyari ) राज्यपाल हे खूप मोठे पद आहे. त्या पदाची गरिमा राखणे ( Status of governor ) गरजेचे आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या मताची नोंद होत ( controversy of Bhagatsingh Koshyari ) असते.

बच्चू कडू
बच्चू कडू
author img

By

Published : Mar 1, 2022, 7:17 PM IST

Updated : Mar 1, 2022, 7:32 PM IST

पिंपरी-चिंचवड - ( पुणे) - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले वक्तव्य ( Bacchu Kadu over governor statement ) म्हणजे मूर्खपणा आहे. या शब्दांत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. ते पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, ( Bacchu Kadu slammed governor Koshyari ) राज्यपाल हे खूप मोठे पद आहे. त्या पदाची गरिमा राखणे ( Status of governor ) गरजेचे आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या मताची नोंद होत ( controversy of Bhagatsingh Koshyari ) असते. भविष्यात ते पुस्तकरूपी वाचनात ही येतात. हे पाहता त्यांनी तुलनात्मक बोलणे गरजेचे असते. त्यामुळे हे वक्तव्य निंदनीय आहे. एवढा मूर्खपणा कोणीही केला नसता, तेवढा मूर्खपणा राज्यपालांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्यपालांचे वाचन हे विचित्र पुस्तकाकडे गेले असेल. काही ठराविक वळणाकडे गेलेले दिसते. पण मी काय वाचले आणि मी काय बोलले पाहिजे, याचे भान राखायला हवे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा- Image of Mahavikas Aghadi : स्वच्छ प्रतिमेसाठी ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता

ईडी भाजपच्या कार्यालयाचा भाग
नवाब मलिकांनी राजीनामा देण्याचा विषयच येत नाही. कारण ईडी हा शासकीय विषय राहिलेला नाही. तो भाजपच्या कार्यालयातीलच एक भाग झाला आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही भाजपची कारवाई झालेली आहे.

हेही वाचा-Russia-Ukraine Conflict : रशियाच्या हल्ल्यात 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, चल्लागेरी गावात शोकाकुल वातावरण

युक्रेन विद्यार्थी भारतात आणले श्रेय
राज्य सरकारला युक्रेनमध्ये विद्यार्थी अडकल्याने खूप फोन येत आहेत. त्या सर्वांची माहिती घेऊन आम्ही केंद्र सरकारला माहिती कळवली आहे. हे तर आमचे कर्तव्यच आहे ना? यात श्रेय घ्यायचा काय संबंध ? आता एखाद्याला तहान लागली अन त्याला पाणी पाजले तर आम्ही पाणी पाजलेय पाणी पाजले असे म्हणणे उचित नाही. त्यामुळे श्रेय कुठे घेतलं पाहिजे. कुठे थांबले पाहिजे, याचे भान राखायला हवे.

हेही वाचा-Ramdas Athawale on Governor's Statement : राज्यपालांनी 'त्या' वक्तव्यावरून माफी मागण्याची आवश्यकता नाही - मंत्री रामदास आठवले

समर्थ नसते तर शिवाजी नसते - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते, समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले. समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी आयुष्यात गुरूचे महत्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Mar 1, 2022, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.