ETV Bharat / city

Devendra Fadnavis Pune Development : पुणे देशात क्रमांक एकचे शहर बनवू -देवेंद्र फडणवीस

पुणेकरांना आमचे वचन आहे की, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ( Pune Municipal Corporation Elections ) पुन्हा भाजपची सत्ता आल्यास पूणे शहराला देशात क्रमांक एकच शहर बनवू, असे वचन पुणेकर नागरिकांना राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Pune Development ) यांनी दिला.

bjp office inauguration in pune devendra fadnavis
भाजप कार्यालय उद्घाटन पुणे फडणवीस
author img

By

Published : Dec 4, 2021, 1:22 AM IST

Updated : Dec 4, 2021, 11:47 AM IST

पुणे - पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, शिवसेना ( devendra fadnavis criticize shivsena ) तर नावालाही उरलेली नाही. हे कुठलेही पक्ष असो. पण, जनतेच्या मनात भाजप आहे. पुणेकर विकासाच्याच मागे जाणार आहे. आणि हा विकासाचा ध्यास आम्ही घेतला आहे. पुणेकरांना आमचे वचन आहे की, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपची सत्ता आल्यास पूणे शहराला देशात क्रमांक एकच शहर बनवू, असे वचन पुणेकर नागरिकांना राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( devendra fadnavis on pune city ) यांनी दिला.

हेही वाचा - जो पुण्याचे पाणी कमी करेल, पुणेकर त्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही - देवेंद्र फडणवीस

पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या नूतन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली.

बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

भगव्याचा मान नसलेल्यांबरोबर भगव्याची शपथ घेणारे

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा झेंडा महापालिकेवर फडकवायचा आहे. मला अलीकडच्या काळात भाजपच्या भगव्याचा विशेष उल्लेख करावा लागतो. कारण भगव्याची शपथ घेणारे अशा लोकांसोबत आहेत ज्यांना भगव्याचा मान नाही, सन्मान नाही, ज्यांना स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेण्यास लाज वाटते, अशा लोकांच्या मांडीला ते मांडी लावून बसलेत. ते लोक रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, अशी बोचरी टीका यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर ( devendra fadnavis criticize shivsena ) केली.

भ्रष्टाचारामुळे नोकरशाही संपुष्टात

महाराष्ट्रात वसुलीशिवाय काही सुरू नाही. नोकरशाही संपुष्टात येते. राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराने महाराष्ट्रातील नोकरशाहीला पोखरून टाकले. सामान्य माणसांचा विचार करायला कोणी तयार नाही. पुणे महापालिकेला १ पैसा कोविड काळात राज्य सरकारने दिला नाही. तरी देखील महापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार देण्यात आले. कोरोना काळात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता जिवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून लोकांची मदत करत होता, असे देखील फडणवीस म्हणाले.

..त्यांना जनता माफ करणार नाही

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्यात २ शिवसेनेचे खासदार आहेत. तेव्हा संसदेत निलंबित सदस्यांना माफी मागण्यास सांगितले. त्यांनी असे विधान केले की, आम्ही माफी मागायला सावरकर आहोत का? भ्रष्टाचाराच्या पैशातून ज्यांचे महाल पोसले गेले ते सावरकरांचा अपमान करतात. त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, असे देखील यावेळी फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - Ashok Saraf felicitated at PIFF : मराठी लोकांना जेवढी कॉमेडी कळते तेवढी कोणालाच कळत नाही - अशोक सराफ

Last Updated : Dec 4, 2021, 11:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.