ETV Bharat / city

सलग 60 दिवस मॅरेथॉन धावत आशिष कासोदेकर यांनी केला जागतिक विक्रम

author img

By

Published : Jan 26, 2022, 2:25 PM IST

आशिष कासोदेकर (Ashish Kasodekar) यांनी सलग 60 दिवस मॅरेथॉन धावण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी (दरदिवशी 42.195किमी) एकूण 2531.7 किलोमीटर अंतर धावण्याचा नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Ashish Kasodekar
Ashish Kasodekar

पुणे: पुणेकर आशिष कासोदेकर यांनी आज अल्ट्रा डायनामो या सर्वाधिक सलग 60 दिवस (दररोज 42.195किमी)अंतर धावण्याचा नवा जागतिक विक्रम नोंदवला (Ashish Kasodekar set a world record ) आहे. त्याचबरोबर या विक्रमाची नोंद गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. ते मॅरेथॉन शर्यतीत आपला वेगळा ठसा उमटविणारे आणि प्रदीर्घ काळ सायकलिंग करणारे बास्केटबॉलपटू आहेत.

आशिष कासोदेकर यांनी जागतिक विक्रम केल्यानंतर माहिती देताना
आशिष कासोदेकर यांनी या आधी काल इटली, ट्यूरिनच्या एन्झो कॅपोरासोचा विक्रम मोडीत काढला. एन्झो याने 2019मध्ये 14 सप्टेंबर ते 11 नोव्हेंबर 2019 या कालावधीत हा विक्रम नोंदविला होता.
Ashish Kasodekar
Ashish Kasodekar

सलग 60 दिवस(दरदिवशी 42.195किमी अंतर)धावून केला विक्रम -

फिट इंडिया मूव्हमेंटच्या माध्यमातून (Through the Fit India Movement) आशिष कासोदेकर यांनी हा विक्रम केला आहे. त्यांनी आतापर्यंत 28 नोव्हेंबर 2021 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीत सलग 60 दिवस (दरदिवशी 42.195किमी अंतर)धावून यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आज, 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनी आशिष कासोदेकर सकाळी 9 वाजता आपल्या जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. या प्रसंगी भारतीय ऍथलिट शायनी अब्राहीम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, ट्रॅव्हल टाईमचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह संस्थापक विवेक काळकर, कोहिनुर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.