पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्यावर हल्ला करण्याच्या कटाची खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या इसमास लोणावळा पोलिसांनी केली अटक केली आहे. Arrest for threatening Cm Eknath Shinde अजय वाघमारे असे अटक केलेल्या Threat to CM Eknath Shinde आरोपीचे नाव आहे. पंरतु त्याला 149 कलमाअंतगर्त सोडण्यात आले आहे.
आरोपी हा मूळचा आटपाडीचा रहिवासी असलेला वाघमारे हा मुंबईला जात असताना लोणावळ्यातील एका धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबला होता. हॉटेल मालकाने त्याला 10 रुपयांची पाण्याची बॉटल पंधरा रुपयाला दिल्याने हॉटेल मालकाला धडा शिकवण्यासाठी वाघमारे यांनी पोलिसांना खोटा कॉल केला होता. पोलिसांना खोटी माहिती देऊन यंत्रणेची धावपळ उडवणाऱ्या वाघमारेवर लोणावळा शहर पोलिसात विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आले होते.
पोलिसांची माहिती याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी हा दारूच्या नशेत असताना लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्याने हॉटेलमधून पाण्याची बाटली विकत घेतली. मात्र हॉटेल मालकाने १० रुपयांची बाटली त्याला १५ रुपयांना दिली. जास्त किंमत लावणल्याचा राग मनात धरून हॉटेल मनेजर आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा उद्देशाने त्याने पोलिसांना फोन करून त्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे ठार मारण्याचा प्लॅन चालु आहे, ही माहिती खोटी दिली असल्याचे अविनाश आप्पा वाघमारे याने सांगितले होते. यानंतर पोलिसांनी माहिती घेत त्याला लोणावळ्यातून अटक करण्यात आलं आहे. आणि त्याच्यावर कलम 177 नुसार कारवाई करत अटक करण्यात आली होती. पोलिसांनी वाघमारे करून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्याला कलम 149 नुसार समस देऊन सोडण्यात आल आहे.