ETV Bharat / city

Amit Shah Pune Visit : वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थानचे दीक्षांत समारोह अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न; वाचा प्रत्येक अपडेट्स - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात

Amit Shah in Pune
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
author img

By

Published : Dec 19, 2021, 7:56 AM IST

Updated : Dec 19, 2021, 5:22 PM IST

17:14 December 19

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थानचे (VAMNICOM) दीक्षांत समारोह अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न

अमित शाह व संस्थानचे विद्यार्थी
अमित शाह व संस्थानचे विद्यार्थी

पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थानचे (VAMNICOM) दीक्षांत समारोह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

15:41 December 19

महापालिकेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण अन् छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन

पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुणे महापालिकेच्या वतीने महापालिका आवारात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

15:37 December 19

देशातील प्रत्येक जिल्ह्यात मोबाइल फॉरेन्सिक प्रयोगशाळा यूनिट तयार करण्याचे लक्ष्य

पुणे - देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात मोबाइल फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळा ( MFSL ) तयार करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

14:50 December 19

CFSL : सीएफएसएल कॅम्पसच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

जेवण करताना अमित शाह
जेवण करताना अमित शाह

पुणे - केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी एनडीआरएफ जवानांसोबत जेवण केले.

13:15 December 19

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शिवसैनिकांना दिली भेटीची वेळ

भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या घरी संध्याकाळी साडेसात वाजता अमित शाह शिवसैनिकांना भेटणार आहेत. शहरप्रमुख संजय मोरे यांनी ही माहिती दिली.

13:15 December 19

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मावळ मधील सुदुंबरे येथील NDRF च्या कॅम्प ला भेट देणार असून NDRF मध्ये नवीन कॅम्पचे उद्घाटन करणार आहेत.

13:15 December 19

अमित शाह जबाब दो काँग्रेस राबवणार सोशल मीडियावर मोहीम

10:51 December 19

अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो - अमित शाह

महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो आणि आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो, असे साकडे शाह यांचे गृहमंत्री अमित शहा यांनी दगडूशेठ गणपतीला घातले. गणरायाला महाअभिषेक करताना अमित शाह यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.

10:38 December 19

अमित शाह यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतलं. तसेच आरतीही केली. गणपतीच्या दर्शनाने त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरवात केली आहे.

09:20 December 19

अमित शाहांच्या दौऱ्याची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन आणि आरतीनं होत आहे.

07:52 December 19

Amit Shah Maharashtra Visit : अमित शाह यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती; वाचा प्रत्येक अपडेट्स

पुणे - केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह (Minister Amit Shah maharashtra Tour) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज ते पुणे ( Amit Shah in Pune ) शहराला भेट देणार आहेत. पुणे महापालिकेकडून अमित शाहांच्या दौऱ्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे शाह यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दौऱयाच्या पहिल्या दिवशी अमित शाह यांनी प्रवरानगर ( Amit Shah visit Pravaranagar Loni in Ahmednagar ) इथल्या देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेतलं.

दौऱ्याचा दुसरा दिवस -

तर आज ते पुणे शहराला भेट देतील. गृहमंत्री शाह थेट पुणे महापालिकेत येणार ( Amit Shah to visit Pune ) असून त्यांच्या शुभहस्ते महापालिकेतील हिरवळीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण ( Dedication of statue Dr Babasaheb Ambedkar in pune ) होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे महापालिकेच्या हिरवळीवर महापौर मोहोळ यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारक साकारण्यात येत आहे. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात येत आहे. हे दोन्ही कार्यक्रम गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहेत, असे मोहोळ म्हणाले. दोन्ही कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थित राहणार आहे.

शिवसेनेचा आंदोलनाच इशारा -

पुण्यातील शिवसैनिकांनी अमित शाह यांच्या कार्यक्रमस्थळी आंदोलनाचा इशारा दिलाय. कर्नाटकातील (Karnatak) बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी हा इशारा दिलाय.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा -

आगामी महापालिका निवडणुकांच्या (PMC Elections) पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. या दौऱ्याच्या निमित्ताने महापालिका निवडणुकांचा नारळ अमित शाह यांच्या हस्ते फोडला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

हेही वाचा - PM Narendra Modi Goa Tour : गोवा मुक्ती दिनानिमित्त मोदी गोवा दौऱ्यावर; अनेक कामांचा करणार शुभारंभ

Last Updated : Dec 19, 2021, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.