ETV Bharat / city

डिंबा धरणात बुडालेले आंबेगाव दुष्काळामुळे आले वर, गावकऱ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा - dam

जुन्या पध्दतीच्या विटांमध्ये बांधलेल्या इमारती, विविध मंदिरे व चारही दिशांना पसरलेल्या सह्याद्रीच्या सुंदर रांगानी आंबेगाव वैभवसंपन्न होते. आंबेगाव तालुक्यातील घोडनदी व गुंबरानदीच्या संगमावर पुर्वी आंबेगाव हे गाव वसलं होते. मात्र, १९७८ साली याच २ नद्यांवर डिंबा हा जलाशय उभा करण्यात आला.

आंबेगाव
author img

By

Published : May 9, 2019, 9:44 PM IST

पुणे - जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीतील आंबेगाव तालुक्यातील डिंबा धरणाचे पाणी कमी होऊ लागल्याने धरणाखाली गेलेले आंबेगाव गावठाण पुन्हा दिसू लागले आहे. त्यामुळे गावकर्‍यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आंबेगाव गावातील प्रतिक्रिया देताना नागरिक

जुने आंबेगाव गावठाण व येथील जलसमाधिस्त झालेले प्रसिध्द जैन मंदिर पूर्णपणे उघडे पडले आहे. तब्बल २० वर्ष पाण्याखाली राहूनही हे जैन मंदिर अजूनही सुस्थितीत असून मंदिरात आत-बाहेरून असलेली कलाकुसर, कोरीव काम व नक्षीकाम आजूनही जसेच्या तसे असलेले पाहायला मिळते. पाण्याखाली गेलेल्या आंबेगाव गावठाणातील घर व वाडे यांचे ढिगारे, पुर्वजांची थडगी, तेलाचे घाणे, मंदिर व जैन मंदिर पाहता त्याकाळचे महत्वाचे व्यापारी ठिकाण असलेले आंबेगाव किती समृद्ध होते, याचा आजही अंदाज येतो.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डिंबा धरणाच्या कालव्यातुन पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आला. यामुळे धरणाची पाणी पातळी खालावल्याने पाण्याखाली गेलेले गाव पुन्हा दिसु लागले आहे. आंबेगाव तालुक्यातील घोडनदी व गुंबरानदीच्या संगमावर पुर्वी आंबेगाव हे गाव वसलं होते. मात्र, १९७८ साली याच २ नद्यांवर डिंबा हा जलाशय उभा करण्यात आला.

आंबेगाव ३५ वर्षांपूर्वी उत्तम बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती. या गावात तालुक्यातील अनेक गावाचे लोक येत होते. जुन्या पध्दतीच्या विटांमध्ये बांधलेल्या इमारती, विविध मंदिरे व चारही दिशांना पसरलेल्या सह्याद्रीच्या सुंदर रांगानी हे गाव वैभवसंपन्न होते. गावाच्या किनाऱयावरुन वाहणाऱ्या घोड सरीता नदीमुळे गाव सुंदर दिसत होते.

आज दुष्काळाचे संकट आले असताना आंबेगावाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. नागरिकही आपल्या गावाचे जुने रुपडे पाहण्यासाठी येत आहेत. यावेळी येथे राहणारे ग्रामस्थ गावातील जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

Intro:Anc__ पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीतील आंबेगाव तालुक्यातील डिंबा धरणाचे पाणी कमी होऊ लागल्याने धरणाखाली गेलेल्या "आंबेगाव गावठाण" पुन्हा दिसू लागले त्यामुळे गावकर्‍यांच्या आठवणींना आता उजाळा मिळतोय..चला पहावुयात तालुक्याचं गाव नामशेष झालेल्या आंबेगाव गावच्या आठवणी....एक स्पेशल रिपोर्ट...

गेल्या वर्षीचे पाऊसाचे प्रमाण कमी होतं त्यामुळे दुष्काळी संकट येत असताना डिंबा धरणाच्या कालव्यातुन पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आला त्यामुळं धरणाची पाणी पातळी खालावली मात्र यामुळेच पाण्याखाली गेलंलं गाव पुन्हा दिसु लागलं आंबेगाव तालुक्यातील घोडनदी व गुंबरानदीच्या संगमावर पुर्वी आंबेगाव हे गाव वसलं होतं मात्र 1978 साली याच दोन नद्यांवर डिंबा हा जलाशय उभा राहिला....

आंबेगाव" हे गाव 35 वर्षांपूर्वी सर्व संपन्न गाव म्हणुन एक वेगळी ओळख होती उत्तम बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या या गावात तालुक्यातील अनेक गावची मंडळी उपजिविकेसाठी आंबेगावात धाव घेत. कारण आंबेगाव म्हणजे हेच तालुक्याचे एकमेव उत्तम ठिकाण होते. जुन्या पध्दतीच्या विटांमध्ये बांधलेल्या इमारती, विविध मंदिरे व चारही दिशांना पसरलेल्या सह्याद्रीच्या सुंदर रांगानी हे गाव आजुनच वैभवसंपन्न दिसत होते. त्यात भर घातली होती ती गाव किना-यावरून खळखळ वाहणा-या घोड सरीता मातेने. अगदी पाहणाऱ्यांची दृष्ट लागावी असे हे गाव प्रत्येकाच्या नजरेत भरलेले असायचे त्याच "गावाचा आता तालुका म्हणुन एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे"

डिंबा धरणाच्या उभारणीनंतर अनेक गावे स्थलांतर झाली.खेळणारे चिमुकले हात, गावांतील गजबजलेल्या गल्ल्या, शाळेतील मुलांची घोकंपट्टी सर्व काही शांत होत गेले. जुनी घरे, वाडे, मंदिरे जमिनदोस्त झाली. भरभराटीला आलेले व्यवसायांची क्षणात होळी झाली.

जुने आंबेगाव गावठाण व येथील जलसमाधिस्त झालेले प्रसिध्द जैन मंदिर पूर्णपणे उघडे पडले आहे. तब्बल वीस वर्ष पाण्याखाली राहूनही हे जैन मंदिर अजूनही सुस्थितीत असून मंदिरात आत-बाहेरून असलेली कलाकुसर, कोरीव काम व नक्षीकाम आजूनही जसेच्या तसे असलेले पाहायला मिळते. पाण्याखाली गेलेल्या आंबेगाव गावठाणातील घर व वाडे यांचे ढिगारे, पुर्वजांची थडगी, तेलाचे घाणे, मंदिर व जैन मंदिर पाहता त्याकाळचे महत्वाचे व्यापारी ठिकाण असलेले आंबेगाव किती समृद्ध आसेल याचा आजही अंदाज येतो.

आज दुष्काळाचं संकट आलं असताना आंबेगावाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय नागरिकही येऊन आपल्या गावचं जुनं रुप,आठवणी येथे येऊन सांगतात हे सारं भारावुन टाकणारं आहे हे मात्र नक्की...

Byte __नागरिक..Body:स्पेशल स्टोरी...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.