ETV Bharat / city

Ajit Pawar Comment On St Workers - कुठंतरी हा विषय संपला पाहिजे; अजित पवारांची एसटी संपावर प्रतिक्रिया - एसटी कर्मचाऱ्यांचेही पगार

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी हे विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून एसटी कर्मचाऱ्यांनी संप ( St Workers Strike ) सुरू केला आहे. राज्य शासनाच्या वतीने वारंवार आवाहन करून देखील आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar Comment On St Workers Strike ) यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले. कुठेतरी हा विषय संपला पाहिजे, असे ते म्हणाले.

ajit pawar comment on st workers
अजित पवारांची एसटी संपावर प्रतिक्रिया
author img

By

Published : Nov 27, 2021, 3:35 PM IST

Updated : Nov 27, 2021, 3:48 PM IST

पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी हे विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून एसटी कर्मचाऱ्यांनी संप ( St Workers Strike ) सुरू केला आहे. राज्य शासनाच्या वतीने वारंवार आवाहन करून देखील आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहे. राज्य शासनाने पगारवाढ करून देखील कर्मचारी विलिनीकरणावर ठाम असून, संप सुरूच राहणार, या भूमिकेवर ते ठाम आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar Comment On St Workers Strike ) यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले. कुठेतरी हा विषय संपला पाहिजे, असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार

हेही वाचा - Solapur Highway Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर 6 जणांना चिरडले; 3 ठार, 3 जखमी

संप मिटला पाहिजे

कोणत्याही प्रश्नाबाबत आक्रमक न होता सरकार दोन पाऊल मागे - पुढे आल्यास आंदोलकांनी देखील दोन पाऊल मागे पुढे व्हायला पाहिजे. ज्या तारखेला राज्य शासनाचे अधिकारी तसेच, कर्मचाऱ्यांचे पगार होणार आहे, त्याच तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचेही पगार होणार आहेत. तसेच, राज्य शासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा विषय मार्गी लावण्यात आलेला आहे. त्यामुळे, गेली अनेक वर्षांपासून जो काही एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा विषय होता तो मार्गी लागलेला आहे. त्यामुळे, आता याचा विचार करून हा संप मिटला पाहिजे, असे अजित पवार ( Ajit Pawar In Pune ) म्हणाले.

प्रत्येक महामंडळ अशाच पद्धतीने मागणी करणार

विलिनीकरणाबाबत न्यायालय जो काही निर्णय घेणार, तो निर्णय मान्यच करावा लागणार आहे. आज राज्यात राज्यशासन सोडून कितीतरी महामंडळे आहेत. प्रत्येक महामंडळ अशाच पद्धतीने मागणी करेल. एसटी सुरू झाल्यापासूनच महामंडळात आहे. एसटीत काम करणारे कर्मचारी देखील हे एसटीचे कर्मचारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे, कर्मचाऱ्यांनी आक्रमक न होता दोन पावले पुढे मागे होऊन विचार करावा, असे आवाहन देखील पवार यांनी केले.

हेही वाचा - Cooperative society election सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून 27 हजार संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम घोषित

Last Updated : Nov 27, 2021, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.