ETV Bharat / city

पुणे : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस येणार एकाच व्यासपीठावर - devendra fadnavis in pune

महापालिकेच्या वतीने भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा 1 जानेवारीला आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार आहे.

bhama askhed irrigation project
पुणे : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस येणार एकाच व्यासपीठावर
author img

By

Published : Dec 31, 2020, 12:49 PM IST

पुणे - महापालिकेच्या वतीने भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा 1 जानेवारीला आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार आहे.

पुणे : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस येणार एकाच व्यासपीठावर
1 जानेवारी रोजी सर्वच प्रमुख नेत्यांची उपस्थितीशहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या पूर्ततेसाठी सर्वच पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले आहेत. या योजनेतून शहराच्या पूर्व भागासाठी 2.60 टीएमसी पाणी मिळेल. या भागातील नागरीकांच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या कोरोनाची स्थिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात आचारसंहिता आहे. यामुळे या योजनेच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम महापालिका सभागृहात घेण्यात येणार आहे. सभागृहात सर्वच पक्षाचे शहराध्यक्ष, आमदार अशा मर्यादित लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा 1 जानेवारी रोजी सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने दुपारी 4 वाजता पार पडणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सगळे एकत्र असणे गरजेचे - महापौर योजनेचे लोकार्पण करत असताना सगळे एकत्र असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महापालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला. या निर्णयानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकात पाटील, खासदार गिरीष बापट यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. सर्व पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर असताना हा लोकार्पण सोहळा 1 जानेवरी रोजी महापालिकेच्या मुख्यसभागृहात दुपारी चार वाजता होणार आहे. त्यामुळे चांगला संदेश जाईल, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.श्रेयवादासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप लोकांना हा कार्यक्रम पहाता यावा, यासाठी महापालिका परिसरात एलीडी लावण्यात येणार आहे. या योजनेचे काम राज्यात व महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची सत्ता असताना काम सुरू झाले होते. त्यानंतर राज्यात व महापालिकेत भाजपची सत्ता आली. या कालावधीत हे काम पूर्णत्वाला गेले. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी योजनेच्या कामात राजकारण केले नाही. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी कामं केली आहेत. या कामाच्या श्रेयवादासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही केले. आता सर्व पक्षीय नेते एकत्र येत लोकार्पण करत आहे.यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आदी यावेळी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.