ETV Bharat / city

Aircraft Tyre Burst at Pune Airport : पुणे विमानतळावर विमानाचा टायर फुटला; विमानसेवा कोलमडली

लोहगाव विमानतळावरून (Pune Airport) जाणाऱ्या एका विमानाचा टायर फुटल्यामुळे (Aircraft suffers Tyre Burst) विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला आहे. ही घटना आज (30 मार्च) एकच्या सुमारास घडली. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

Pune Airport
लोहगाव विमानतळ
author img

By

Published : Mar 30, 2022, 3:32 PM IST

पुणे - लोहगाव विमानतळावरून (Pune Airport) जाणाऱ्या एका विमानाचा टायर फुटल्यामुळे (Aircraft suffers Tyre Burst) विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला आहे. ही घटना आज (30 मार्च) एकच्या सुमारास घडली. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. लोहगाव विमानतळावर उड्डाण करत असतानाच एका विमानाचा टायर फुटला. त्यामुळे धावपट्टी देखील खराब झाली आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने तत्काळ विमानसेवा बंद केली आहे. परिणामी, प्रवाशांना आता विमानतळावरच थांबावे लागत आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे.

याबाबत विमानतळ संचालकांना विचारले असता, त्यांनी या घटनेची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. धावपट्टी हवाई दलाच्या अखत्यारित असल्यामुळे अधिक माहितीसाठी हवाई दलाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले आहे.

प्रवाशांना मनस्ताप - विमानाचा टायर फुटल्यामुळे धावपट्टी देखील खराब झाली आहे. त्यामुळे इतर विमानांच्या उड्डाणांना विमानतळ प्रशासनाने तत्काळ थांबवले आहे. यामुळे सकाळपासूनच प्रवाशांना विमानतळावरच ताटकळत थांबावे लागत आहे. विमानतळाचे दिवसाचे ७० ते ८० विमान उड्डाणांचे शेड्युल ठरलेले असते. मात्र, या घडलेल्या घटनेमुळे पूर्ण शेड्युलवर परिणाम होणार आहे. याचा फटका विमानतळ प्रशासनासोबतच सर्वाधिक प्रवाशांनाच बसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.