ETV Bharat / city

आदित्य बिर्ला रुग्णालयात निकृष्ट दर्जाचे जेवण? रुग्णसेवकांचे धरणे आंदोलन

पिंपरी-चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयात रुग्णसेवक आणि सेविकांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा गंभीर आरोप तेथील कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच, इतर अनेक मागण्यांसाठी आज (गुरुवार) रुग्णसेवक आणि सेविकांना धरणे आंदोलन केले.

author img

By

Published : Aug 6, 2020, 9:56 PM IST

Agitation by Aditya Birla Hospital patient helpers
आदित्य बिर्ला रुग्णालयातील रुग्णसेवकांचे धरणे आंदोलन

पिंपरी-चिंचवड (पुणे) : पिंपरी-चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयात रुग्णसेवक आणि सेविकांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा गंभीर आरोप तेथील कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच, इतर अनेक मागण्यांसाठी आज (गुरुवार) रुग्णसेवक आणि सेविकांना धरणे आंदोलन केले. रुग्णालयाच्या अधिकारी रेखा दुबे यांनी मात्र हे आरोप खोडुन काढले आहेत.

धरणे आंदोलनाला बसलेल्या रुग्णसेवकांनी यावेळी आरोप केले की, रुग्ण सेवकांवर अन्याय होत आहे. रुग्णालयात जेवण व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे स्टाफ काम करण्यास इच्छुक नाही. गेल्या महिन्यात रुग्णालय प्रशासनाने आश्वासन दिले होते की, कोविड साहित्य मिळेल आणि पगारवाढ होईल. मात्र, तसे झाले नाही. आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्यात. कोविड वॉर्डमध्ये 12 तास रुग्णालयात ड्युटी करावी लागत आहे. मानसिक त्रास होत आहे, असे अनेक आरोप रुग्णालयावर केले आहेत.

हेही वाचा - रुग्णवाहिकेच्या कमतरतेमुळे आजही होत आहेत रुग्णांचे हाल, रुग्णांची लूट सुरूच

रुग्णालय अधिकारी रेखा दुबे याबाबत बोलताना म्हणाल्या की, मानसिक त्रास आणि निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असेल तर त्यांनी कोणाकडे जायला हवे? त्यांनी आमच्याकडे यायला हवे होते. पण, ते माध्यमांकडे गेले आहेत. त्यांना जे जेवण मिळत ते मी आणि इतर स्टाफ देखील खात आहोत. आम्ही रुग्णांना बरे करण्यासाठी आहोत. त्रास देण्यासाठी नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.