पुणे - पुण्यातली गुंड शरद मोहोळ व त्याच्या अन्य साथीदारांची ( Ganesh Mohol Acquitted ) पुणे सत्र न्यायालयाने गणेश मारणेची हत्येचा ( Ganesh Marne Murder Conspiracy Case ) कट रचल्याच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाकडून 10 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती.
काय आहे प्रकरण -
२००६ साली पुण्यात संदिप मोहोळ याची हत्या झली होती. या प्रकरणात गणेश मारणे याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. या अटकेनंतरच गणेश मारणे याची हत्येचा कट रसल्याचा आरोप करत खडक पोलिसांनी शरद मोहोळ, अनिल खोले, अजय कडू, विकास प्रभाकर पायगुडे आणि आलोक शिवाजी भालेराव या साऱ्यांना आरोपी ठरवत २०१२ साली अटक केली होती. त्याच बरोबर आरोपींनी हा गुन्हा करण्यासाठी ससून हॉस्पिटल व शिवाजी नगर कोर्ट परिसरात रेकी देखील केल्याचे तपासात समोर आल होते. पोलीसांनी आरोपींकडून १० पिस्टल व ७९ जीवंत काडतुसे जप्त केली होती.
सर्वांची या आरोपातून निर्दोष मुक्तता -
सर्व आरोपीतर्फे न्यायालयात अॅड. तानाजी सोलनकर व अॅड. मयूर दोडके यांनी युक्तिवाद केला. सर्व आरोपींविरुद्ध सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करता आला नाही. तसेच गणेश मारणे याचा पोलिसांनी जवाब नोंदविला नाही. त्यामुळे आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला. मात्र, सर्वांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
हेही वाचा - Night Curfew in Maharashtra : मुंबईत नाताळ, नववर्षाच्या पार्ट्या आणि कार्यक्रमांवर बंदी