पुणे: पुण्यात गुरुवारी सकाळी शाळेच्या शौचालयात एका अल्पवयीन अकरा वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचर केल्याचा धक्कादायक प्रकार ( sexually abusing 11-year-old girl ) घडला होता. या घटनेतील आरोपीला स्वच्छतागृहातच लैंगिक अत्याचार करणाऱ्याआरोपीला अखेर रात्री उशीरा पोलीसांनी अटक केली ( Rape Accused Arrested ) आहे. त्याच्याविरुध्द शिवाजीनगर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी कालच आरोपीचे रेखाचित्र प्रसिद्ध केले होते. तो शाळेतच सुरक्षारक्षक म्हणुन कार्यरत होता अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आरोपीला ठोकल्या बेड्या - शाळेच्या स्वच्छतागृहातच अकरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पुणे क्राईम ब्रँचने बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी त्याच शाळेचा सुरक्षा रक्षक असल्याची माहिती समोर येत आहे. एवढेच नाही तर तो पीडितेच्या वडीलांचा ओळखत होता. परवा सकाळी तो पीडित मुलीशी बोलायला आला आणि त्याने तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. मंगेश असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. पिडीत तरुणी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका नामांकित शाळेत शिक्षण घेते. अत्याचार केल्यानंतर त्याने या विषयी कुणाला बाहेर काही सांगितल्यास बघ अशी धमकी देखील होती. पीडित मुलीच्या पालंकांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चोवीस तासात आरोपीला बेड्या ठोकल्या.