पुणे - बाणेर येथे गेल्या महिन्यात एका व्यक्तीच्या खून करून मृतदेह जाळण्यात आला होता. या प्रकरणी हिंजवडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चार पथकाने ब्ल्यूटूथ च्या आधारे मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कोट्यवधींच्या कर्जातून ओळखीच्या व्यक्तीचा खून करून स्वतः असल्याचं आरोपीने पोलिसांना भासवलं होतं. त्यामुळे कर्जातून कायमची सुटका होईल, असा भ्रम आरोपीला होता. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संदीप पुंडलिक माईनकर असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कर्जबाजारी असलेल्या आरोपीचे मेहबूब दस्तगिर शेख नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
कट स्वत:च्या खुनाचा... मात्र मित्राने गमावला जीव
ठरल्यानुसार बाणेर येथील दर्गाजवळ मित्राचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला. मात्र, मृत व्यक्तीच्या अर्धवट जळालेल्या कागदावरून तो व्यक्ती संदीप असल्याचं समोर आलं. तसेच, घटनास्थळी मिळालेल्या ब्ल्यूटूथचा दुसरा भाग हा आरोपीच्या घरी सापडला. तसेच, तांत्रिक तपास करून आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली. त्याने त्यांच्या मित्राचा कट रचून खून केला असल्याची कबुली दिली आहे.
हिंजवडी आणि गुन्हे शाखा युनिट चार पथकाची कामगिरी
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, परिमंडळ दोनचे पोलीस उप-आयुक्त आनंद भोईटे, गुन्हे
शाखेचे सहा. पोलीस आयुक्त आर.आर. पाटील, वाकड विभागाचे सहा.पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, उद्धव खाडे तपासपथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, पोलीस अंमलदार बंडू सणे, किरण पवार, महेश बायबसे,आतिक शेख,हनुमंत कुंभार,कुणाल शिंदे आणि अन्य अधिकाऱ्यांनी ही कामगिरी केली.