ETV Bharat / city

पुण्यातील सेंट्रल मॉलमध्ये रसायन गळती, वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला - pune central mall chemical leak

पुणे शहरातील गरवारे महाविद्यालयानजिक असलेल्या सेंट्रल मॉलमध्ये सोमवारी रासायनिक वायू गळतीची घटना घडली. मॉलच्या पार्किंगमध्ये रसायन असलेल्या बॅगमधून ही गळती झाली होती.

पुण्यातील सेंट्रल मॉलमध्ये रसायन गळतीने खळबळ

author img

By

Published : Mar 29, 2021, 5:17 PM IST

Updated : Mar 29, 2021, 7:38 PM IST

पुणे : शहरातील गरवारे पुलाजवळील सेंट्रल मॉलच्या पार्किंगमध्ये रासायनिक वायू गळतीची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत गळतीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

रसायन गळतीने खळबळ

पुणे शहरातील गरवारे महाविद्यालयानजिक असलेल्या सेंट्रल मॉलमध्ये सोमवारी रासायनिक वायू गळतीची घटना घडली. मॉलच्या पार्किंगमध्ये रसायन असलेल्या बॅगमधून ही गळती झाली होती. ही घटना समोर आल्यानंतर तातडीने मॉल रिकामे करण्यात आले आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यानंतर अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने सेंट्रल मॉल परिसरात दाखल झाले. दलाच्या जवानांनी तत्परतेने कारवाई करत या गळतीवर नियंत्रण मिळविले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. घटनास्थळावर दोन रसायनांचा समावेश असलेली एक बॅग आढळून आली असून गळती रोखण्यात यश आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून मॉल पुन्हा उघडण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी आता केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पुण्यातील सेंट्रल मॉलमध्ये रसायन गळतीने खळबळ

मॉलच्या पार्कींगमध्ये धुराचे लोट -

पुणे शहरातील कर्वे रस्त्यावरील गरवारे कॉलेज जवळ असलेल्या सिटी सेंट्रल मॉल मध्ये अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघाल्याची घटना घडली होती. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला, सेंट्रल मॉलच्या पार्कींग मधून हे धुराचे लोट येत होते, मोठ्या प्रमाणात येणाऱ्या या धुरामुळे आयर्वेद रसशाळेकडून गरवारे पुलाकडे जाणारा रस्ता काही काळ बंद करण्यात आला होता, धुराच्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, पार्किंगमध्ये रेस्क्यू करताना जवानांना अडचणी येत होत्या, पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट होते, त्यामुळे जवानांना अडचणी येत होत्या. धुराचे लोट वाढल्याने मॉल मधील कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना बाहेर काढण्यात आले होते. मॉलच्या पार्कींग मध्ये केमिकल पावडर पडलेली होती. त्या पावडरमुळे धूर झाला असल्याचे दिसून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही पावडर पार्कींग मधून बाहेर काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मॉलमध्ये ही पावडर कुठून आली याचा तपास केला जात आहे. या केमिकल पावडरची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल)अधिकाऱ्यामार्फत तपासणी केली जाते आहे.

हेही वाचा - बॅगेत आढळला महिलेचा मृतदेह, नालासोपाऱ्यातील घटना

Last Updated : Mar 29, 2021, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.