ETV Bharat / city

पैशाच्या पावसाची वाट पाहत राहिला, मांत्रिकाकडून लागला 53 लाखांचा चुना - पुणे पोलीस बातमी

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यापाऱ्याला मांत्रिकाने 53 लाखांचा चुना लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मांत्रिकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पैसे
पैसे
author img

By

Published : Jun 3, 2021, 8:24 PM IST

पुणे - जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका व्यापार्‍याची तब्बल 53 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका मांत्रिकाला गजाआड केले आहे. 2017 पासून हा प्रकार सुरू होता. किसन आसाराम पवार (वय 41 वर्षे), असे अटक करण्यात आलेल्या मांत्रिकाचे नाव आहे. पुण्यातील एका चाळीस वर्षीय व्यावसायिकाने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रांच्या माध्यमातून तक्रारदार आणि आरोपी मांत्रिकाची ओळख झाली होती. आरोपीने तक्रारदाराला विश्वासात घेऊन स्वतःमध्ये दैवी शक्ती असून पैशाचा पाऊस पाडून दाखवतो, असे सांगितले. यासाठी छोटीशी पूजा करावी लागेल आणि पूजेसाठी काही पैसे द्यावे लागतील, असे त्याने तक्रारदाराला सांगितले. तक्रारदारानेही त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला वेळोवेळी 52 लाख एक हजार रुपये दिले. दरम्यान, इतके पैसे देऊनही पैशाच्या पाऊस न पडल्याने तक्रारदाराने संबंधित मांत्रिकाला पैसे देणे बंद केले.

काही दिवसांपूर्वीच आरोपीने तक्रारदारास एक शेवटचा विधी राहिला आहे तो तुम्हाला करावा लागेल, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराला मानसिक धक्का बसला आणि त्यांनी तत्काळ पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी या तक्रार अर्जाची खातरजमा करत आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. आरोपी जालना जिल्ह्यातील हिवरखेड येथे असल्याने जालना पोलिसांची मदत घेत बनावट ग्राहक पाठवून सापळा रचून त्याला अटक केली. सिन्नर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - सैन्यदलाची बनावट वेबसाइट करून नोकरी देण्याचे आमिष दाखवत फसवणूक; पुण्यात रॅकेटचा पर्दाफाश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.