ETV Bharat / city

मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह पोस्ट, पुण्यातून भाजपचा कथित कार्यकर्ता ताब्यात - पुणे क्राईम न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची बदनामी करण्याच्या हेतूने फेसबूकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे, offensive text about Chief Minister Udhhav Thackeray
मुख्यमंत्री ठाकरे
author img

By

Published : May 11, 2021, 11:04 AM IST

Updated : May 11, 2021, 12:13 PM IST

पुणे - मराठा आरक्षणावरुण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी फेसबूकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी एकाला विमानतळ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52, रा. माऊली बंगलो, जिल्हा परिषद शाळे जवळ, वडगाव शिंदे, ता. हवेली) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात भादवि 500, 501 सह आयटी अॅक्ट क 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आनंद रामनिवास गोयल (वय 44) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे हा स्वत: भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगत आहे. त्याने आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करून आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केला आहे.

मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीची नीतिभ्रष्ट करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक फेसबुकवर पोस्ट टाकून घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य करून त्यांची बदनामी केली आहे. त्यामुळे विमानतळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - काँग्रेस हा राष्ट्रीय आघाडीचा आत्मा असल्याचा संजय राऊत यांना साक्षात्कार - नाना पटोले

Last Updated : May 11, 2021, 12:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.