ETV Bharat / city

7th Pay Commission PMPML Worker : राष्ट्रवादीच्या आंदोलनास यश, पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

पुण्यातील पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला ( 7th Pay Commission PMPML Worker ) आहे. राष्ट्रवादीतर्फे याच मागणीसाठी हजारो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेला मानवी साखळी करून घेराव घालण्यात आला होता.

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

author img

By

Published : Feb 9, 2022, 8:16 PM IST

पुणे : पुणेकरांची अहोरात्र सेवा करणाऱ्या पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला ( 7th Pay Commission PMPML Worker ) आहे. पुणे महानगरपालिकेतील ( Pune Municipal Corporation ) सत्ताधाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू न केल्याने शहराध्यक्ष प्रशांत जगताप ( Prashant Jagtap NCP ) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चार दिवसांपूर्वी हजारो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे मनपा भवनला मानवी साखळी करून घेराव घालण्यात आला होता.

राष्ट्रवादीच्या आंदोलनास यश, पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

त्यामुळे आले यश

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या आंदोलनास आज यश आले आहे. आंदोलनानंतर येत्या महानगरपालिका निवडणुकीत ( PMC Election 2022 ) भाजपच्या विरोधात मोठा रोष निर्माण होऊ शकतो असे दिसताच सत्ताधाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला. यासाठीचा ठराव नगरसेवक प्रदीप गायकवाड यांनी दिला होता. तर त्यास अनुमोदन नगरसेविका नंदाताई लोणकर यांनी दिले होते.

पेढे वाटून आपला आनंद साजरा

पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच आपल्या न्याय्य हक्कांसाठी PMPML कर्मचाऱ्यांना वारंवार आंदोलन करावे लागले ही बाब पुणे शहराला गौरवास्पद नाही, अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख राष्ट्रवादी कामगार सेल अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, किरण थेऊरकर, सुनील नलवडे, राजेंद्र कोंडे, हरीश ओहळ, कैलास पासलकर आदी उपस्थित होते. यावेळी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी फटाके वाजवून व पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.