पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात आज (सोमवार) नव्याने ६८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून महानगरपालिकेच्या हद्दीतील एका ७८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १,४६ वर पोहचली आहे. तर मृत्यूंचा एकूण आकडा ४१ वर पोहोचला आहे.
आज शहरात तब्बल ६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ८०० पेक्षा अधिक रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत.
हेही वाचा... 'ईटीव्ही भारत' विशेष: 'सध्या मजूर कमी आणि ऑफिस स्टाफ जास्त' - बांधकाम व्यवसायिक जयदीप राजे
सोमवारी आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह हे लक्ष्मीनगर वडमुखवाडी, गुलमोहर कॉलनी पिंपळे गुरव, निगडी, नवभारतनगर दापोडी, बौध्दनगर पिंपरी, भिमाशंकर नगर दिघी, जयभीमनगर दापोडी, श्रीकृष्ण कॉलनी काळेवाडी, लिंबोरेवस्ती दापोडी, पवारवस्ती दापोडी, आदर्शनगर दिघी, साईबाबानगर चिंचवड, यमुनानगर, रमाबाईनगर पिंपरी, अजंठानगर, शाहूनगर, आनंदनगर, सद्गुरुकॉलनी वाकड, सिदार्थनगर दापोडी, सखाराम काटेचाळ दापोडी, वाकड, कासारवाडी, मोरवाडी, पिंपरी कॉलनी वाघेरे पार्क, खडकी व खेड येथील रहिवासी आहेत.
तर, आनंदनगर, अजंठानगर, चिंचवड, बौध्दनगर पिंपरी, नवभारतनगर दापोडी, नानेकरचाळ पिंपरी, जुनी सांगवी, रमाबाईनगर पिंपरी, गुरुदत्तनगर पिंपरी, लालटोपीनगर मोरवाडी, दापोडी, दिघी, दळवीनगर चिंचवड, पिंपरी, आकुडी, यमुनानगर,भोसरी व सांगवी येथील रहिवासी असलेले कोविड-१९ बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.