ETV Bharat / city

Arogya Bharti : आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई; लातूरच्या बड्या अधिकाऱ्यांसह पाच जणांना अटक

आरोग्य विभागाच्या (Arogya Bharti ) लेखी परिक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) मुंबई डॉकयार्डमधील एक खलाशी आणि निवृत्त जवानाला अटक केली आहे. त्यामुळे या पेपर फुटीमध्ये अटक झालेल्यांची संख्या वाढत आहे.

आरोग्य भरती प्रकरण
Arogya Bharti scam
author img

By

Published : Dec 8, 2021, 9:22 AM IST

पुणे - आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी (Health Recruitment Paper leak Case) मोठी कारवाई करण्यात आली असून लातूर येथील उपसंचालक, आरोग्य सेवा कार्यालयातील मुख्य प्रशासकिय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे यांना अटक केली आहे.

यापूर्वी आरोग्य विभागाच्या (Arogya Bharti )लेखी परिक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) मुंबई डॉकयार्डमधील एक खलाशी आणि निवृत्त जवानाला अटक केली आहे. त्यामुळे या पेपर फुटीमध्ये अटक झालेल्यांची संख्या वाढत आहे.

बदगीरेंनी 15 लाख घेतल्याचे तपासात उघड -

बडगिरेंनी पेपर पुरविल्याचे तसेच सदर पेपरसाठी त्यांचेच आरोग्य विभागातील डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड यांचेकडून १० लाख रु व शिपाई शाम महादू मस्के यांच्याकडून 5 लाख रुपये घेतल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे.या प्रकरणातील आरोपी प्रशांत व्यंकटराव बडगिरे याने पेपर कसा व कोठून मिळविला त्याचा तपास सुरू आहे.

एवढा ठरलं होता रेट -

पेपर देण्याच्या बदल्यात एका उमेदवाराकडून ६ ते ७ लाख रुपये घेण्याचे ठरले होते. त्यापैकी ५० हजार रूपये आरोपींना मिळणार होते. बाकीची रक्कम त्यांना वरती द्यावी लागणार होती. उमेदवारांनी अद्यापपर्यंत पैसे दिले नव्हते. मात्र, यादीमध्ये नाव आल्यानंतर त्यांना पैसे द्यावे लागणार होते. त्यासाठी आरोपींनी उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे ठेवून घेतली असल्याचे समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.