पुणे - राज्यात सध्या 42 कोरोनाग्रस्त रुग्ण असून पुण्यात 18 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात दिली. या सर्व रुग्णांची पकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच खासगी रुग्णालयांनाही कोरोनाची चाचणी करण्यासंदर्भात परवानगी दिली आहे. मात्र, त्याचा खर्च रुग्णांना करावा लागणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, वर्क फ्रॉम होमची काटोकोरपणे अंमलबजावणी येत्या दिवसात होईल. नागरिकांनी प्रवास केला असेल तर त्यांची चाचणी करणे अनिवार्य असून त्या चाचण्यांसाठी लॅब वाढवण्यात येत आहेत. एकूण आठ लॅबमध्ये चाचण्या करण्यासाठी परवानगी दिली असून उद्यापासून तीन लॅब सुरू होणार आहेत. तसेच देशाबाहेरून भारतात आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्याचे मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आरोग्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे -
- दुबई ग्रुपमुळे रुग्णांमध्ये वाढ
- 8 ठिकाणी तपासणी लॅब सुरू करणार
- सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱयांना बोलवणार
- 3 ठिकाणी उद्यापासून तपासणी लॅब सुरू होणार
- खासगी रुग्णालयांना तपासणीसाठी परवानगी, मात्र त्याचा खर्च रुग्णांनी करायचा
- राज्यात 42 रुग्ण कोरोनाग्रस्त, सर्वांची पकृती स्थिर
- पुण्यात 18 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत
- तपासणीसाठी लागणारे उपकरणांची परवानगी केंद्राकडे केली असून ती उपकरणे लवकरच येतील
- सोशल मीडियावर अफवांचे मेसेज पाठवू नका.
- गरज असेल तरच प्रवास करा. गर्दी टाळा