ETV Bharat / city

पुण्यात अतिवृष्टीचा 420 गावांना फटका; एकाचा मृत्यू तर 6 जनावरे दगावली, शेतीचे कोट्यवधीचे नुकसान - pune latest news

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका पुणे जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यातील तब्बल 420 गावे या पावसामुळे बाधित झाली होती. तर भोर तालुक्यातील मौजे आंबवडे गावातील एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तर मुळशी तालुक्यात सतत सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे सहा जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे.

पुण्यात अतिवृष्टीचा 420 गावांना फटका
पुण्यात अतिवृष्टीचा 420 गावांना फटका
author img

By

Published : Jul 24, 2021, 3:31 PM IST

पुणे - मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका पुणे जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यातील तब्बल 420 गावे या पावसामुळे बाधित झाली होती. तर भोर तालुक्यातील मौजे आंबवडे गावातील एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तर मुळशी तालुक्यात सतत सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे सहा जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. याशिवाय शेती पीक व फळपिकांचे देखील कोट्यवधींचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

पावसाचा फटका पुणे जिल्ह्यातील 420 गावांना

हवामान विभागाने 22 जुलै रोजी पुणे जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला होता. 21 जुन ते 20 जुलै या कालावधीत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका पुणे जिल्ह्यातील 420 गावांना बसला. यातील 10 गावांना पूर्णतः तर 410 गावांना अंशतः फटका बसला. गावात, घरात पाणी शिरल्यामुळे मावळ तालुक्यातील 133 कुटुंबातील 398 व्यक्तींचे, मुळशी तालुक्यातील 10 गावातील 40 व्यक्तींचे तर भोर तालुक्यातील 33 कुटुंबातील 163 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. या कुटुंबातील व्यक्तींचे जिल्हा परिषद शाळांमध्ये, डोंगरावर असणाऱ्या गावात, आरोग्य केंद्रांमध्ये आणि नातेवाईकांच्या घरांमध्ये स्थलांतर करण्यात आले होते.

पुण्यात अतिवृष्टी
पाहा सर्वाधिक पाऊस झालेले तालुके

अतिवृष्टीमुळे चाळीस घरांचे नुकसान

भोर तालुक्यातील मौजे अंबवडे गावातील मोहन अमृत घोरपडे (वय 27) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोल्ट्रीमध्ये लिफ्टिंग करत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुळशी तालुक्यातील 6 पशुधनचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे मुळशी, जुन्नर, खेड, मावळ, भोर तालुक्यातील चाळीस घरांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पावसामुळे जिल्ह्यातील 95 विद्युत खांब आणि दोन रोहित्राचे देखील नुकसान झाले आहे.

पुण्यात अतिवृष्टी
अतिवृष्टीचा 420 गावांना फटका

शेती पिकांचे नुकसान
जिरायती पिके बाधित क्षेत्र हेक्टर - 3134.3
बागायती बाधित क्षेत्र हेक्टर - 49
एकूण बाधित क्षेत्र हेक्टर - 3183
एकूण बाधित शेतकरी संख्या - 9993

हेही वाचा - Maharashtra Flood: राज्यात अतिवृष्टीमुळे 76 जणांचा मृत्यू, 59 जण अद्याप बेपत्ता, आतापर्यंत 90 हजार लोकांना वाचवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.