ETV Bharat / city

'सासू-सासरे बायकोला नांदू देत नाहीत', चिट्ठी लिहून नवऱ्याची आत्महत्या

author img

By

Published : Sep 2, 2021, 7:39 AM IST

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या बायकोच्या भांडखोर वृत्तीला आणि सासू, सासरे आणि मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे शरद भोसलेने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. सुसाईड नोटमध्ये पुढे लिहिले आहे, की 'सासू, सासरे बायकोला नांदू देत नाहीत, त्यांच्या आणि बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनकवडी परिसरात 28 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.

30 year old Man commits suicide
पत्नी-सासू-सासरे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

पुणे - येथील सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील धनकवडी परिसरात एका ३० वर्षीय विवाहित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार, सासू-सासरे-मेव्हणा पत्नीला नांदण्यास पाठवत नाहीत आणि या सर्वांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

काय आहे प्रकरण :

शरद नरेंद्र भोसले (३०) या तरुणाने २८ ऑगस्ट रोजी राहत्या घरात बेडरूममधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत तरुणाचे वडील नरेंद्र भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शरदची पत्नी प्रियंका शरद भोसले (वय 28), सासू रोहिणी शंकर शिंदे (वय 50), सासरा शंकर शिंदे (वय 56) आणि मेहुणा मनीष उर्फ गणेश शंकर शिंदे (वय 26) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'पत्नी घेत होती चारित्र्यावर संशय'

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या बायकोच्या भांडखोर वृत्तीला आणि सासू, सासरे आणि मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे शरद भोसलेने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. सुसाईड नोटमध्ये पुढे लिहिले आहे, की 'सासू, सासरे बायकोला नांदू देत नाहीत, त्यांच्या आणि बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनकवडी परिसरात 28 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 साली शरद आणि प्रियांकाचे लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून पत्नीचे आईवडील त्यांच्या संसारात हस्तक्षेप करत होते.आई वडिलांच्या सांगण्यावरून प्रियांका घरामध्ये कौटुंबिक कारणावरून व चारित्र्यावर संशय घेऊन सतत भांडण करून शरदला त्रास देत होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी मनीष उर्फ गणेश याने भांडण मिटवण्यासाठी फिर्यादी नरेंद्र भोसले आणि त्यांचा मुलगा शरद यांना मार्केटयार्ड परिसरात बोलावून शिवीगाळ आणि मारहाण केली होती. या सर्व त्रासाला कंटाळून शरद याने 28 ऑगस्ट रोजी राहत्या घरात बेडरूममधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी शरदने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. त्यात सासू सासरे बायकोला नांदू देत नाहीत, तिला भडकवतात. तसेच तिच्या आणि सासू सासऱ्यांचा त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे अधिक तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.