ETV Bharat / city

2 crore Sound system stolen लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटींचे साऊंड सिस्टीम चोरीला

बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Lokshahir Annabhau Sathe Natyagruha) नाट्यगृहातील 2 कोटी रुपये किंमतीचे साऊंड सिस्टीम चोरीला (2 crore Sound system stolen) गेले आहे. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी डुप्लिकेट साऊंड सिस्टीम बसवल्याचा गौप्यस्फोट नगरसेवक सुभाष जगताप (Corporator Subhash Jagtap) यांनी केला आहे.

Lokshahir Annabhau Sathe Natyagruha
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह
author img

By

Published : Nov 22, 2021, 5:33 PM IST

Updated : Nov 22, 2021, 6:46 PM IST

पुणे - बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Lokshahir Annabhau Sathe Natyagruha) नाट्यगृहातील 2 कोटी रुपये किंमतीचे साऊंड सिस्टीम चोरीला (2 crore Sound system stolen) गेले आहे. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी डुप्लिकेट साऊंड सिस्टीम बसवल्याचा गौप्यस्फोट नगरसेवक सुभाष जगताप (Corporator Subhash Jagtap) यांनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पुणे महापालिकेचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी केली आहे.

माहिती देताना नगरसेवक सुभाष जगताप

हेही वाचा - Aryanman competition : बारामतीच्या सुपुत्राने आयर्नमॅन स्पर्धा केली 13 तासात पूर्ण

लॉकडाऊनच्या काळात सुमारे 2 कोटी रुपयांचे साऊंड सिस्टीम चोरीला गेले

बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात (Lokshahir Annabhau Sathe Natyagruha) 2 कोटी रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम बसवण्यात आली होती. दीड वर्षांपासून कोरोनामुळे नाट्यगृहे बंद होती. या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील बॉश कंपनीचे सुमारे 2 कोटी रुपयांचे साऊंड सिस्टीम चोरीला गेले. एवढेच नव्हे तर, त्या ठिकाणी डुप्लिकेट साऊंड बसवण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणी काय कारवाई केली. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल केला नाही, असा गौप्यस्फोट नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला. नगरसेवक अविनाश बागवे यांनी, प्रकाराची प्रशासनाला माहिती आहे का? असा प्रश्न करत तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. यावर उपायुक्त संतोष वारुळे यांनी या संदर्भात विद्युत विभागाचे पत्र मिळाले आहे. या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

ही चोरी प्रशासनाच्याच माणसाने केल्याचा आरोप

बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात सीसीटीव्ही लावण्यात आले असून, या नाट्यगृहात २४ तास सुरक्षारक्षक असून देखील येथे २ कोटी रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम चोरीला गेली. ही चोरी बाहेरच्या माणसाने केली नसून ओळखीच्याच माणसाने केली आहे. चोरी प्रशासनाच्याच माणसाने केली आहे, असा आरोप देखील जगताप यांनी केला.

हेही वाचा - रिक्षा भाडे वाढ : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या दीड किलोमीटरसाठी मोजावे लागणार २१ रुपये

Last Updated : Nov 22, 2021, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.