ETV Bharat / city

पुणे विभागात आतापर्यंत 13 हजार 576 रुग्ण झाले कोरोनामुक्त - pune latest news

राज्यात तर आज (गुरुवार) एकाच दिवशी तब्बल 4,841 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मात्र, एक दिलासादायक बातमीही समोर येत आहे. ती म्हणजे पुणे विभागातील म्हणजेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागात आतापर्यंत 13 हजार 576 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

corona
कोरोना
author img

By

Published : Jun 25, 2020, 10:15 PM IST

पुणे - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिसव वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. रुग्णांची वाढ होत असल्यामुळे सरकारही चिंतेत आहेत. राज्यात तर आज (गुरुवार) एकाच दिवशी तब्बल 4,841 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मात्र, एक दिलासादायक बातमीही समोर येत आहे. ती म्हणजे पुणे विभागातील म्हणजेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागात आतापर्यंत 13 हजार 576 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

पुणे विभागात आजवर 13 हजार 576 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजार 59 आहे. तर ॲक्टिव रुग्ण 7 हजार 548 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकुण 472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 472 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्रमाण 61.54 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.24 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

corona patient in pune division
पुणे विभागात आतापर्यंत 13 हजार 576 रुग्ण झाले कोरोनामुक्त

हेही वाचा... 'कोरोना उपचाराची औषधे जून अखेरीस प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होणार'

पुणे जिल्ह्यात 17 हजार 905 कोरोनाबाधित रुग्ण असून 10 हजार 601 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण संख्या 6 हजार 664 आहे. कोरोनाबाधित एकूण 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 365 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.21 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.57 टक्के इतके आहे. कालच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 706 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 631, सातारा जिल्ह्यात 14, सोलापूर जिल्ह्यात 22 , सांगली जिल्ह्यात 23 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित 864 रुग्ण असून 680 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण संख्या 143 आहे. कोरोनाबाधित एकूण 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 209 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 388 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्णसंख्या 585 आहे. कोरोनाबाधित एकूण 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित 316 रुग्ण असून 197 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण संख्या 110 आहे. तर कोरोनाबाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा... पुण्यात कस्टम विभागाकडून दोन कोटींच्या गांज्यासह चरस जप्त; चौघांना अटक

कोल्हापूर जिल्ह्यातील 765 कोरोनाबाधित रुग्ण असून 710 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्णसंख्या 46 आहे. तर कोरोनाबाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुणे विभागामध्ये एकुण 1 लाख 48 हजार 902 स्व‌ॅब नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी 1 लाख 45 हजार 750 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 152 नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 23 हजार 364 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 22 हजार 59 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.