ETV Bharat / city

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पर्याय म्हणून जलवाहतुकीकडे पाहणे गरजेचे - मायकल लोबो

गोव्यात वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून अंतर्गत जलवाहतूक सुरू करण्याची आवश्यकता आहे. अंतर्गत जलवाहतुकीसाठी कृती आराखड्याची गरज आहे, असे मत गोव्याचे बंदर आणि कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले. ते कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री गोवा विभाग आयोजित कॉन्फरन्स ऑन लॉजिस्टिकक्समध्ये पाहुणे म्हणून बोलत होते.

goa
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री गोवा विभाग आयोजित कॉन्फरन्स ऑन लॉजिस्टिकक्स
author img

By

Published : Dec 1, 2019, 8:46 AM IST

पणजी - गोव्यातील अंतर्गत रस्ते यापुढे रुंद करणे अशक्य आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून जलवाहतुकीकडे पाहणे गरजेचे असून याकरिता आतापासूनच काम केले पाहिजे. अन्यथा पुढील पिढ्या आम्ही काय केले? असे विचारतील, असे प्रतिपादन गोव्याचे बंदर आणि कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले. 'कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री' गोवा विभाग आयोजित 'कॉन्फरन्स ऑन लॉजिस्टिकक्स'मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री गोवा विभाग आयोजित कॉन्फरन्स ऑन लॉजिस्टिकक्स

या कार्यक्रमात बोलताना लोबो म्हणाले, गोव्यात अंतर्गत जलवाहतूक सुरू करण्याची आवश्यकता आहे. मात्र, असा काही प्रयत्न केला तर काही मंडळी तत्काळ विरोध करण्यास सुरुवात करतात. यामध्ये ज्यांनी गोव्याचे आणि देशाचे नागरिकत्व सोडले ते विदेशातून सल्ले देत असतात. आमचा विकास करण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचे त्यांना सांगितले पाहिजे. अंतर्गत जलवाहतुकीसाठी कृती आराखड्याची गरज आहे. आम्हाला वास्तव समजून घेतले पाहिजे आणि विरोध करणाऱ्यांना तेथेच उत्तर दिले पाहिजे. तसेच गोव्यासाठी मेरीटाईम बोर्ड होणे आवश्यक आहे. यावेळी गोव्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो, सीआयआय गोवाचे अध्यक्ष ललित सारस्वत, माजी अध्यक्ष श्रीनिवास धंपो, अँथनी गास्केल, अतुल जाधव आणि भारतीय अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरणाच्या अध्यक्ष अमृता प्रसाद आदि उपस्थित होते. गोव्यात पर्यटन उद्योगात मंदी आली आहे. दर्जेदार पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या उद्योजकांचे नुकसान होत आहे, त्यामुळे येथे माल ने-आण झाली पाहिजे, असे लोबो म्हणाले.

वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले, गोव्यात नवे प्रकल्प येताच त्याला विरोध करणाऱ्या अनेक बिगर सरकारी संस्था (एनजीओ) आहेत. जे सातत्याने नव्या प्रकल्पांना विरोध करत असतात, ते स्वतः बरोबर समाज आणि देशाचेही नुकसान करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी उद्योजकांनी सकारात्मक विचार पसरवणारे एनजीओ तयार केले पाहिजेत. सरकार 'सेस' बाबत विचार करत आहे. राज्यात सध्या खाणबंदीचा परिणाम जाणवत आहे. परंतु, डिसेंबर अखेर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यावर मार्ग निघेल. तसेच वस्तू आणि सेवा करात जहाज उद्योगासाठी कशाप्रकारे सूट देता येईल यावर विचार सुरू आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललित सारस्वत यांनी केले. त्यानंतर धेंपो, जाधव यांनी विचार व्यक्त केले. तर, अमृता प्रसाद यांनी जलवाहतूक आजच्या घडीला का महत्त्वाची आहे, याविषयी सविस्तर माहिती दिली.

हेही वाचा - 'महाराष्ट्रातील युती तुटल्याचा फायदा गोव्यात येणाऱ्या काळात शिवसेनेला होईल'

हेही वाचा - सध्या गोव्यात सत्तांतर म्हणजे दिवा स्वप्नच - प्रभाकर ढगे

Intro:पणजी : गोव्यातील अंतर्गत रस्ते यापुढे रुंद करणे अशक्य आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून जल वाहतुकीकडे पाहणे गरजेचे आहे. याकरिता आतापासूनच काम केले पाहिजे. अन्यथा पुढील पिढ्या आम्ही काय केले, असे विचारतील, असे प्रतिपादन गोव्याचे बंदर आणि कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री गोवा विभाग आयोजित कॉन्फरन्स ऑन लॉजिस्टिकक्समध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

Body:यावेळी गोव्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो, सीआयआय गोवाचे अध्यक्ष ललित सारस्वत, माजी अध्यक्ष श्रीनिवास धंपो, अँथनी गास्केल, अतुल जाधव आणि भारतीय अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरणाच्या अध्यक्ष अम्रुता प्रसाद उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना लोबो म्हणाले, गोव्यात अंतर्गत जलवाहतूक सुरु करण्याची आवश्यकता आहे. असा काही प्रयत्न केला तर काही मंडळी तत्काळ विरोध करण्यास सुरुवात करतात. यामध्ये ज्यांनी गोव्याचे आणि देशाचे नागरिकत्व सोडले ते विदेशातून सल्ले देत असतात. आमचा विकास करण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचे त्यांना सांगितले पाहिजे. अंतर्गत जलवाहतुकीसाठी क्रूती आराखड्याची गरज आहे. आम्हाला वास्तव समजून घेतले पाहिजे आणि विरोध करणाऱ्यांना तेथेच उत्तर दिले पाहिजे. तसेच गोव्यासाठी मेरिटाईम बोर्ड होणे आवश्यक आहे.
गोव्यात पर्यटन उद्योगात मंदी आली आहे. दर्जेदार पर्यटकांची संख्या कमी झाली आहे, असे सांगून त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या उद्योजकांना नुकसान होत आहे. त्यामुळे येथे माल ने-आण झाली पाहिजे.
तर वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले, गोव्यात नवे प्रकल्प आले की विरोध करणाऱ्या अनेक बिगर सरकारी संस्था (एनजीओ) आहेत. जे सातत्याने नव्या प्रकल्पांना विरोध करत असतात. ते स्वतः बरोबर समाज आणि देशाचेही नुकसान करतात. त्यांना रोखण्यासाठी उद्योजकांनी सकारात्मक विचार पसरवणारे एनजीओ तयार केले पाहिजेत. सरकार 'सेस' बाबत विचार करत आहे. राज्यात सध्या खाणबंदीचा परिणाम जाणवत आहे. परंतु, डिसेंबर अखेर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यावर मार्ग निघेल. तसेच वस्तू आणि सेवा करात जहाज उद्योगासाठी कशाप्रकारे सुट देता येईल यावल विचार सुरू आहे,, असेही ते म्हणाले.
ललित सारस्वत यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर धेंपो, जाधव यांनी विचार व्यक्त केले. अम्रुता प्रसाद यांनी जलवाहतूक आजच्या घडीला का महत्त्वाची आहे याविषयी सविस्तर माहिती दिली.
....।
बाईट : मॉविन गुदिन्हो

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.