पणजी - गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आज गोवा विधानसभा निवडणुकीचे ( Goa Election Result 2022 ) निकाल हाती आले आहेत. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे वाळपई मतदारसंघातून आणि त्यांच्या पत्नी दिव्या राणे या पर्यें मतदारसंघातून विजयी ( Vishwajeet and his wife Divya Rane won ) झाल्या आहेत. दिव्या राणे यांची ही पहिलीच निवडणूक होती. दिव्या राणे यांनी आपल्या विजयाचे श्रेय आपले सासरे प्रतापसिंह राणे यांना दिले आहे.
सून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर प्रतापसिंह राणे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वाढत्या वयामुळे, कुटुंबाचा कोणताही दबाव नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे प्रतापसिंह राणे यांनी म्हटलं होतं. राणे या मतदारसंघातून 11 वेळा आमदार झाले होते. ते कधीही पराभूत झाले नाहीत.
तर उत्तर गोव्यात मोडणाऱ्या सत्तरी तालुक्यातील वाळपई मतदार संघाचं विश्वजीत राणे प्रतिनिधीत्व करतात. उत्तर गोव्यातील वाळपई विधानसभा मतदार संघावर त्यांची पकड कायम आहे. राणे हे 2017 ला काँग्रेस च्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र अवघ्या महिनाभरात त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन आपल्या सत्तरी युवा मोर्चा तर्फे अपक्ष निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पून्हा विजय झाला व पुढे ते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री झाले होते.
2019 ला मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले व विश्वजित राणे पुन्हा आरोग्यमंत्री झाले. तेव्हापासून राणे यांना मुख्यमंत्री पदाविषयी लालसा निर्माण झाली. त्यानंतर वेळोवेळी राणे आणि मुख्यमंत्री डॉ सावंत यांच्यात अनेकवेळा अप्रत्यक्ष पणे वादही उद्भवले आहेत. सध्या राणे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. आता विश्वजीत राणे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आहेत.