ETV Bharat / city

गोव्यात आयफेलच्या धर्तीवर झुआरी पुलावर व्ह्यूवर्स गॅलरी

गोव्यात आयफेल टॉवरच्या धर्तीवर झुआरी पुलावरील दर्शक गॅलरी विकसित केली जाणार असून हे पर्यटकांचे आकर्षण होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी सोमवारपासून गोव्याच्या दौऱ्यावर होते.

Nitin gadkari
author img

By

Published : Nov 2, 2021, 10:38 PM IST

पणजी - गोव्याच्या मुक्तीनंतर प्रथमच राज्यात २०१४ नंतर मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली गोव्याचा विकास झाला असून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भाजपा सरकारने गोवा राज्याला 25000 कोटींची मदत केल्याचे गडकरी यांनी सांगितले. ते आज (मंगळवारी) पणजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Nitin gadkari
गोव्यात आयफेलच्या धर्तीवर झुआरी पुलावर व्ह्यूवर्स गॅलरी
गोवा सर्वाधिक विकसित राज्य - गडकरीगोव्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांची वार्षिक योजना 2,000 कोटी रुपयांवरुन 5,000 कोटी रुपये करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवारी) राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

झुआरी नदीवर दर्शक गॅलरी
झुआरी नदीवर निर्माणाधीन असलेल्या पूलाविषयी माहिती देताना गडकरी यांनी सांगितले की, पूलावर टोलनाक्यासाठी अधिग्रहित केलेली जागा रेस्टॉरंट आणि पेट्रोलपंप, गॅसस्टेशन या कामासाठी देण्यात येईल. तसेच या पुलावर आयफेल टॉवरच्या धर्तीवर दर्शक गॅलरी निर्माण करण्यात येणार आहे. या गॅलरीसंबंधी आराखडा पूर्ण झाला असून 15 डिसेंबरच्या आत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. निर्माणाधीन झुआरी पुलाच्या एका बाजूच्या कामाचे उद्घाटन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. दर्शक गॅलरीसमवेतच विकसित करणाऱ्या रेस्टॉरंट आणि फूड मॉलमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने येण्यासाठी सुविधा असेल. फूड मॉलमध्ये स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.मोपा विमानतळासाठीच्या जोड रस्त्याचे काम ताबडतोब सुरु करण्यासंबंधी निर्देश देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. सुमारे सात किलोमीटरच्या या रस्त्यासाठी 1200 कोटी रुपये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय खर्च करणार आहे.

गोव्याच्या विकासासाठी नव्या घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज चार नव्या टप्प्यांच्या कामाची घोषणा केली. यात नावेली ते कुंकळी हा साडेसहा किमी लांबीचा रस्ता तयार केला असून, 24 हेक्टर भूमी अधिग्राहण करण्यात आली आहे. यासाठी 270 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच काणकोण बाह्य वळण रस्ता ते पोळे हा 8 किलोमीटर रस्ता सुमारे पावणे दोनशे कोटी रुपये खर्च करुन निर्माण केला जाणार आहे. संजीवनी साखर कारखाना, धारबांदोडा ते खांडेपार रस्त्यासाठी 200 कोटी रुपये आणि फोंडा ते भोमा या चौपदरी रस्त्यासाठी 575 कोटी रुपये अशा एकूण 1250 कोटी रुपयांच्या कामाला मंजूरी देण्यात आली.

ड्रेजिंगचे काम अपूर्णच
नौवहन मंत्रालयाने सागरमाला प्रकल्पातून मुरगाव बंदरासाठी मंजूर केलेले ड्रेजिंगचे काम सध्या अपूर्ण आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल, असे गडकरी म्हणाले. तसेच इलेक्ट्रॉनिक कलस्टर, औषधनिर्मिती कारखाने, मासेमारीसाठी स्वतंत्र जागा (फिशींग हार्बर) या कामांचा डिपीआर पूर्ण झाला आहे. ही कामे लवकरच मार्गी लागतील, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. राज्याच्या चौफेर विकासासाठी अनेक योजना मंजूर केल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्रा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. यावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पर्यावरण आणि पारिस्थितिकी याची काळजी घेऊन विकासकामे हाती घेण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक वाहने
जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण लक्षात घेऊन विकासावर भर दिला जात आहे. लवकरच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय गाड्यांचे हॉर्न सुमधूर करणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. पेट्रोल आणि डिझेल आयातीवर होणारा प्रचंड खर्च टाळण्यासाठी फ्लेक्स इंजिन निर्माण करण्यासंदर्भात वाहन उत्पादकांना सूचना केल्या आहेत, अशी माहिती यावेळी गडकरी यांनी दिली.
हेही वाचा - कोविडकाळातील विधवांना राज्य सरकारचा आधार; वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना होणार लागू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.