ETV Bharat / city

टॅक्सी चालकांच्या विरोधानंतर वाहतूक मंत्री बॅकफूटवर - Goa Transport news

राज्यात मीटर न बसवणाऱ्या टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याची घोषणा करून वादात अडकल्यावर वाहतूक मंत्री माविन गुदींन्हो बॅकफूटवर आले आहेत. टॅक्सीचालक हेच खरे राज्यातील पर्यटनाचे हिरो आहेत. तसेच त्यांना मीटर बसविण्यासाठी सरकार पन्नास टक्के अनुदान देणार, अशी घोषणा त्यांनी केली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने आपल्या वक्तव्याबाबद्दल सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

पणजी
पणजी
author img

By

Published : Aug 9, 2021, 8:01 AM IST

पणजी - राज्यात मीटर न बसवणाऱ्या टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा वाहतूक मंत्री माविन गुदींन्हो यांनी केली होती. मात्र, टॅक्सी चालकांनी विरोध केल्यावर ते बॅकफूटवर आले आहेत. तसेच पंधरा दिवसांत मीटर बसविण्याची मुदतही त्यांनी दिली.

वाहतूक मंत्री माविन गुदींन्हो

राज्यात सरकारने टॅक्सी चालकांना नुकतीच टॅक्सी भाड्यात वाढ करून दिली होती. परंतु ही भाडेवाढ देत असताना वाहतूक मंत्री माविन गुदींन्हो यांनी येत्या पंधरा दिवसांत मीटर बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा टॅक्सी परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला होता. यावर राज्यातील टॅक्सी संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून गुदींन्हो यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.

टॅक्सी चालक हेच खरे हिरो -

टॅक्सी चालकांबाबत केलेले वक्तव्य अंगाशी आल्यानंतर गुदींन्हो यांनी टॅक्सीचालक हेच खरे राज्यातील पर्यटनाचे हिरो आहेत. तसेच त्यांना मीटर बसविण्यासाठी सरकार पन्नास टक्के अनुदान देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने आपल्या वक्तव्याबाबद्दल सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

राज्यातील टॅक्सीचालकांना चुचकरण्याचा प्रयत्न -

राज्यात आधीच गोवा माईल्सवरून टॅक्सीचालक आणि त्यांच्या कुटुंबीयात नाराजीचे वातावरण आहे. त्यातच ही प्रणाली हटविण्यासाठी टॅक्सीचालकांनी त्यांच्या कुटुंबीयांसह पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन केले होते. त्याला अनेक राजकीय नेत्यांनी आपला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार कोणतीही नाराजी ओढवून घेण्याच्या तयारीत नाही. म्हणून भाजपा नेते राज्यातील टॅक्सीचालक व संघटनांना चुचकरण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा - अखेर टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी वाढ

हेही वाचा - गोव्यात परदेशी नागरिकांचेही कोरोना लसीकरण, उत्तम प्रतिसाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.