पणजी - गोव्यात होऊ घातलेल्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जेष्ठ अभिनेते व निर्माते विश्वजीत चॅटर्जी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवण्यात येईल, अशी माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
'बीस साल बाद' चित्रपटातला कुमार विजय सिंग, 'कोहरा' मधला राजा अमित कुमार सिंग, 'एप्रिल फुल' मधला अशोक, 'मेरे सनम' मधला रमेशकुमार या पात्रांसह किस्मतमध्ये त्यांनी साकारलेल्या विकीच्या भूमिकेला रसिकांची मोठी पसंती मिळाली होती. आशा पारेख, वहिदा रेहमान, मुमताज, माला सिन्हा आणि राजश्री या प्रख्यात अभिनेत्रींसमवेत त्यांनी चित्रपटात भूमिका केल्या.
हेही वाचा - कोरोना लसीकरणाचा पहिला दिवस यशस्वी; कोणताही त्रास झाल्याची नोंद नाही
चौरीन्घी (1968), उत्तम कुमार यांच्यासमवेत 'गढ नसीमपूर', 'कुहेली' आणि त्यानंतर श्रीमान पृथ्वीराज (1973), जय बाबा तारकनाथ (1977) आणि अमर गीती (1983) हे त्यांचे बंगाली चित्रपट. 1975 मध्ये चॅटर्जी यांनी ‘कहते है मुझको राजा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबरच गायक आणि निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले.
हेही वाचा - हरयाणात १८ कोरोना योद्ध्यांचा लस घेण्यास नकार, कारण...