ETV Bharat / city

समाजासाठी योगदान न देणारे श्रीमंत हे सडलेल्या बटाट्यासारखे - सत्यपाल मलिक

समाजासाठी एक पैसाही दान न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असे श्रीमंत सडलेल्या बटाट्यासारखे आहेत. सैनिक अथवा शेतकऱ्यांना मदत करणार नाहीत. परंतु, दुर्घटना घडली तर सर्व अधिकारी दाखल होतात, असे सत्यपाल उद्विगनेतेने म्हणाले.

panji
सत्यपाल मलिक
author img

By

Published : Nov 29, 2019, 12:03 AM IST

पणजी - समाजासाठी एक पैसाही खर्च न करणारे श्रीमंत लोक सडलेल्या बटाट्यासारखे असतात, असे वक्तव्य जम्मू काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले. ते भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या सांगता सोहळ्यात बोलत होते.

इफ्फी सोहळ्यात बोलताना सत्यपाल मलिक

मलिक म्हणाले, की मला चित्रपटापासून खूप काही शिकायला मिळाले. चित्रपट खूप काही शिकवून जातात. चित्रपटात आलेले नाही असे अनेक विषय आपल्या देशात आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या हालपेष्टा आणि सैनिकांच्या समस्या याकडे चित्रपट तयार करणाऱ्यांनी लक्ष द्यावे. कारण आपल्या देशात श्रीमंत खूप आहेत. पण समाजासाठी एक पैसाही दान न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असे श्रीमंत सडलेल्या बटाट्यासारखे आहेत. सैनिक अथवा शेतकऱ्यांना मदत करणार नाहीत. परंतु, दुर्घटना घडली तर सर्व अधिकारी दाखल होतात, असे ते उद्विगनेतेने म्हणाले.

आपल्याकडील चित्रपटात प्रामुख्याने पिळवणूक करणारे जमिनदार दाखवले जातात. आता जमीनदार वा महाजन राहिलेले नाही. पण, नव्या महाजन तयार झाले आहेत. या नव्या महाजनांवर चित्रपटातून हल्ला करा असे मलिक म्हणाले. गोव्यातील पणजीमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा (इफ्फी) चे आयोजन करण्यात आले होते. ८ दिवस चाललेल्या या सोहळ्याची आज सांगता झाली.

Intro:पणजी : चित्रपटाकडून शिकता येते यावर माझा विश्वास आहे. पुस्तकापेक्षाही चित्रपट समाजमनावर प्रभाव टाकतात. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी देशातील बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, सैनिक यांवरही प्रकाश टाकावा, असे आवाहन गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले. तसेच समाजासाठी एक पैसाही खर्च न करणारे श्रीमंत म्हणजे सडलेल्या बटाट्यासारखे आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.

Body:सुवर्ण महोत्सवी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या सांगता सोहळ्यात गोव्याचे राज्यपाल मलिक बोलत होते.
मलिक म्हणाले, मला चित्रपटापासून खूप काही शिकायला मिळाले. चित्रपट खूप काही शिकवून जातात. चित्रपटात आलेले नाही, असे अनेक विषय आपल्या देशात आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या हालपेष्टा आणि सैनिकांच्या समस्या याकडे चित्रपट तयार करणाऱ्यांनी लक्ष द्यावे. कारण आपल्या देशात श्रीमंत खूप आहेत. पण समाजासाठी एक पैसाही दान न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असे श्रीमंत सडलेल्या बटाट्यासारखे आहेत. सैनिक अथवा शेतकऱ्यांना मदत करणार नाहीत. परंतु, दुर्घटना घडली तर सर्व अधिकारी दाखल होतात.
आपल्याकडील चित्रपटात प्रामुख्याने पिळवणूक करणारे जमिनदार दाखवले जातात. आता जमीनदार वा महाजन राहिलेले नाही, असे सांगून मलिक म्हणाले, या नव्या महाजनांवर चित्रपटाच्या माध्यामातून थोडा हल्ला करा. या घटाला थोडा स्वरूप नग्न करा असे आवाहन त्यांनी केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.