ETV Bharat / city

पणजीच्या नवनिर्वाचित आमदारांसह तिघांवर विनयभंगाचा गुन्हा

पणजीच्या नवनिर्वाचित आमदारांसह तिघांवर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

बाबूश मोन्सेरात
author img

By

Published : Jun 1, 2019, 3:44 PM IST

पणजी - मांडवी नदीतील तरंगत्या कँसिनोंच्या कार्यालयांनी पणजीतील काही पदपथावर अतिक्रमण केले होते. ते हटविताना झालेल्या बाचाबाचीत एका महिलेने तिच्यावर विनयभंग केल्याची तक्रार पणजी पोलिसांत शुक्रवारी रात्री उशिरा दाखल केली. या तक्रारीत पणजीचे नवनिर्वाचित आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर आणि माजी महापौर यतीन पारेख यांची नावे आहे. या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पणजी महापालिकेतर्फे गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जुन्या सचिवालयाजवळ एका कँसिनोने पदपथावर अतिक्रमण केले होते, ते हटविण्यासाठी कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी एक महिला कँसिनोंच्या व्यवस्थापनाच्यावतीने जाब विचारण्यासाठी पुढे आली. तेथे आमदार मोन्सेरात, महापौर मडकईकरष पारेख आणि काही नगरसेवक उपस्थित होते. तेव्हा त्यांनी अश्लील शब्द वापरून आणि हातवारे करत आपला अपमान केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपण घटनेची माहिती घेत असून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

Intro:पणजी : मांडवी नदितील तरंगत्या कँसिनोंची कार्यालयांनी पणजीतील काही पदपथावर केलेले अतिक्रमण हटविताना झालेल्या बाचाबाची वेळी विनयभंग केल्याची तक्रार पणजी पोलिसांत शुक्रवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आली. या तक्रारीत पणजीचे नवनिर्वाचित आमदार आतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर आणि माजी महापौर यतीन पारेख यांची नावे दिली असल्याने त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Body:गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पणजी महापालिकेतर्फे जुन्या सचिवालयाजवळ एका कँसिनोने पदपथावर अतिक्रमण केले होते ते हटविण्यासाठी कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी सदर महिला कँसिनोंच्या व्यवस्थापनाच्यावतीने जाब विचारण्यासाठी पुढे आली. तेथे आमदार मोन्सेरात, महापौर मडकईकरष पारेख आणि काही नगरसेवक उपस्थित होते. तेव्हा त्यांनी अश्लील शब्द वापरून आणि हातवारे करत आपला अपमान केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपण घटनेची माहिती घेत असून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.