ETV Bharat / city

गोव्यात मुसळधार : पुढील 5 दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी - विशेष सूचना

हवामान खात्याने सोमवारी दुपारी मच्छीमारांना विशेष सूचना जारी केली आहे. तसेच पुढील 5 दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी करत येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

गोव्यात मुसळधार
author img

By

Published : Aug 5, 2019, 4:27 PM IST

पणजी - सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासात जुने गोवे, साखळी, दाबोळी, मुरगांव, केपे, सांगे आदी भागांत 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदी-नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी साचल्याने चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर 24 तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गोव्यात पुढील 5 दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी

हवामान खात्याने सोमवारी दुपारी मच्छीमारांना विशेष सूचना जारी केली आहे. तसेच पुढील 5 दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी करत येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या काळात 115 ते 200 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे.

या काळात समुद्र खवळलेला असणार आहे. तसेच राज्यात पावसाचा वेगही वाढत आहे. सध्या समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे 60 किलोमीटर वेगाने वाहू शकतात. तर जमिनीवरील वाऱ्याचा वेग हा ताशी 20 ते 25 किलोमीटर राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने सुचना जारी केली आहे.

दरम्यान, राज्यातील धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायतीतर्फे नदीकाठावरील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Intro:आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांत जुने गोवे, साखळी, दाबोळी, मुरगांव, केपे, सांगे आदी भागांत 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील नदीनाले भरून वाहत आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. तर महामार्गावर पडलेल्या खड्यात पाणी साचून रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे मुठीत जीव घेऊन वाहने चालवावी ल गत आहे. महामार्गाचे काम सूरू असल्याने अनेक ठिकाणी तयार केलेल्या पर्यायी मार्गातील खड्डे धोकादायक ठरत आहे. खड्ड्यात भरलेल्या पाण्यातून कसा मार्ग काढावा हा प्रश्न वाहन चालकांपुढे निर्माण होत आहे.
हवामान खात्याने आज दूपारी मच्छीमारांना विशेष सूचना जारी केली आहे. पुढील पाच दिवस ' ऑरेंज अलर्ट' जारी करतानाच येत्या चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या काळात 115 ते 200 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे.
या काळात समुद्र खवळलेला राहणार असून राज्यात पावसाचा वेगही वाढत आहे. सध्या समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे 60 किलोमीटर वेगाने वाहू शकतात. तर जमिनीवरील वाऱ्याचा वेग हा ताशी 20 ते 25 किलोमीटर राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायतीतर्फे नदीकाठावरील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Body:पणजी : गोव्यात मागील दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हवामानखात्याने पुढील चोवीस तासांत मुसळधार पावसाबरोबरच वेगवान वारे वाहण्याचा इशारा दिला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.