पणजी - राज्यात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा पत्ता कट होण्याच्या मार्गावर आहे. गोव्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याच्या वाटेवर आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा ( Deputy Chief Minister of Goa Babu Ajgaonkar ) पत्ता कट होण्याच्या वाटेवर आहे. त्यांच्या जागी भाजपाकडून प्रवीण आर्लेकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री व पेडणे मतदारसंघाचे ( Pernem constituency MLA Babu Ajagaonkar ) आमदार बाबू आजगावकर याना डावलून भाजपाने महाराष्ट्र गोमंतक पक्षचे नेते प्रवीण आरलेकर यांना पक्षात घेण्याचे ठरविले आहे, येत्या एक दोन दिवसांत त्यांचा पक्ष प्रवेश उरकला जाऊ शकतो. आर्लेकर यांना भाजपाने पक्षात घेतल्यास बाबू आजगावकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आजगावकर यांचा गेम होणार -
2017 साली आजगावकर हे पेडणे तालुक्यातून महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, 3 आमदार असणाऱ्या या पक्षाच्या 2 आमदारांनी भाजपात प्रवेश केला. पुढे बाबू आजगावकर उपमुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांची दोन वर्षाची भाजपामधील राजकीय कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. त्यामुळे पेडणेतून त्यांना लोकांनी नाकारण्याची शक्यताही आहे. म्हणून आधीच भाजपाने सावध भूमिका घेऊन त्यांचा पत्ता कट करण्याचा डाव आखला आहे.
माझा भाजपाशी काहीही वाद नाही - आजगावकर
आपल्या कारकिर्दीत पेडणे मतदारसंघाचा प्रचंड विकास झाला असून भाजपावर माझा पूर्ण विश्वास आहे. येथे मला पुन्हा एकदा तिकीट मिळणार असून आपण पुढच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मंत्री असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Threat to Aaditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी देणाऱ्याला बंगळूरुमधून अटक