ETV Bharat / city

गोव्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा - ताळगाव

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज गोव्यात योग दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम ताळगाव येथील कम्युनिस्ट सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गोव्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
author img

By

Published : Jun 21, 2019, 1:26 PM IST

पणजी- आज जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. देशभरात विविध ठिकाणी पहाटेपासूनच योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातही विविध ठिकाणी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गोवा राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांची प्रतिक्रिया

योग दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम ताळगाव येथील कम्युनिस्ट सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, क्रीडा संचालक अंजली शेरावत आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी योग गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची आसने केली.

कार्यक्रमानंतर बोलताना आरोग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, आज जगभरात योग केला जात आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकाराने सर्वसामान्यांना योगाचा लाभ होत आहे. याचा गोव्यातील जनतेलाही निश्चितच लाभ होईल. राज्यात सर्वसामान्यांपर्यंत योग पोहचवण्यासाठी 'आयुष' च्या माध्यमातून 8 विभागीय रुग्णालयात योग मार्गदर्शक नियुक्त केले जाणार आहेत. गोव्याच्या योग प्रचारदूत म्हणून नम्रता मेनन यांची निवड करण्यात आली आहे. तसेच वेलनेस सेंटरच्या माध्यमातून अनेक ठिकाणी योगमार्गदर्शक नियुक्त करण्यात येतील. असेही राणे यांनी सांगितले

Intro:पणजी : गोव्यात विविध ठिकाणी जागतिक योग दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सरकारी कर्मचारी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. राज्यस्तरीय कार्यक्रम ताळगाव येथील कम्युनिस्ट सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, क्रीडा संचालक अंजली शेरावत आदी उपस्थित होते.

Body:यावेळी उपस्थितांनी योगुरुंच्या मार्गदर्शनाखाली मुले, नागरिक, काही सरकारी खात्याचे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी विविध प्रकारची आसने केली.
कार्यक्रमानंतर बोलताना आरोग्य मंत्री ल
विश्वजीत राणे म्हणाले, आज जगभरात योग केला जात आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकाराने सर्वसामान्यांना योगाचा लाभ होत आहे. याचा गोव्यातील जनतेलाही निश्चितच लाभ होईल. राज्यात सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी 'आयुष' च्या माध्यमातून 8 विभागीय इस्पितळात योग मार्गदर्शक नियुक्त केले जाणार आहेत. गोव्याच्या योग प्रचारदूत म्हणून नम्रता मेनन यांची निवड करण्यात आली आहे. तसेच वेलनेस सेंटरच्या माध्यमातून अनेक ठिकाणी योगमार्गदर्शक नियुक्त करण्यात येतील. ज्याच सर्वसामान्यांना उपयोग होईल.
यावेळी शालेय विद्यार्थी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.