ETV Bharat / city

गोवा शिपयार्डने बांधलेल्या 'आयसीजीएस सजग'चे अजित डोवाल यांच्या हस्ते लोकार्पण - ICGS Sajag inauguration news

अत्याधुनिक गस्ती नौका 'आयसीजीएस सजग'चे लोकार्पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या हस्ते करण्यात आले. शोध आणि बचाव समुद्री संरक्षण, तेल गळती आणि प्रदूषण रोखण्यासाठी ही नौका पश्चिम किनारपट्टीमध्ये कार्यरत राहणार आहे.

inauguration of ICGS Sajag by Ajit Doval
गोवा शिपयार्डने बांधलेल्या 'आयसीजीएस सजग'चे अजित डोवाल यांच्या हस्ते लोकार्पण
author img

By

Published : May 29, 2021, 8:45 PM IST

पणजी (गोवा) - गोवा शिपयार्डने बांधलेली अत्याधुनिक गस्ती नौका 'आयसीजीएस सजग'चे लोकार्पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या हस्ते करण्यात आले. पश्चिम किनारपट्टीच्या संरक्षणासाठी 'आयसीजीएस सजग' ही तटरक्षक दलात दाखल झाली आहे.

गुजरातच्या पोरबंदर बंदरामध्ये तैनात राहणार -

गस्त आणि निगराणीमध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या अत्याधुनिक गस्ती नौका 'आयसीजीएस सजग' भारतीय तटरक्षक दलात सामील झाली असून ती गुजरातच्या पोरबंदर बंदरामध्ये तैनात असणार आहे. पश्चिम किनारपट्टीच्या संरक्षणाबरोबरच भारतीय तटरक्षक दलासाठी ही नौका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, भारतीय तटरक्षक दलाचे महानिदेशक के. नटराजन, रक्षा सचिव अजयकुमार यांच्या उपस्थितीत 'आयसीजीएस सजग'चा लोकार्पण समारंभ पार पडला.

हेलिकॉप्टर उतरण्याची आहे सोय -

या नौकेवर गस्त आणि निगराणीसाठी अत्याधुनिक बोफोर्स गण त्यासोबतच लांब पल्ल्याच्या छोट्या बंदुकाही उपलब्ध आहेत. अत्याधुनिक 'आयसीजीएस सजग' या जहाजावर छोट्या जलद नौकाही असून हेलिकॉप्टर उतरण्याची सोय आहे. शोध आणि बचाव समुद्री संरक्षण, तेल गळती आणि प्रदूषण रोखण्यासाठी ही नौका पश्चिम किनारपट्टीमध्ये कार्यरत असेल, अशी माहिती यावेळी तटरक्षक दलाकडून देण्यात आली.

हेही वाचा - शाब्बास रे पठ्ठ्या..! आदिवासी तरुणाला गुळवेल पुरविण्याचे १.५ कोटींचे मिळाले कंत्राट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.