पणजी - संसदीय सदस्य म्हणून सभागृहात प्रवेश करणाऱ्या काही चुकीच्या लोकांमुळे राजकारण्यांची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे ही प्रतिमा सुधारण्याची आवश्यकता असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज गोव्यात व्यक्त केले. गोवा विधानसभा प्रांगणात आयोजित गोवा विधीकार दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
विधानसभा सदस्यांचा सत्कार -
गोवा विधानसभा सभापती, विधानसभा आणि गोवा लेजिस्लेचर फोरम यांच्या सहकार्याने दरवर्षी आजच्या दिवशी विधीकार दिन साजरा केला जातो. 9 जानेवारी 1964 रोजी गोवा विधानसभा अस्तित्वात आली आणि 10 जानेवारीपासून कामकाज सुरु झाले. हे वर्ष गोवा मुक्तीचे हिरक महोत्सवी वर्ष असल्याने उपराष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आदी नेते उपस्थित होते. उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते पहिल्या आणि तिसऱ्या विधानसभेतील सदस्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
राष्ट्र म्हणजे केवळ जमिनीचा टुकडा नव्हे -
जात, धर्म, धन आणि गुन्हेगारी प्रभावी ठरले तर लोकशाही आपले अस्तित्व गमावेल. यासाठी सभागृह सदस्याचे वागणूक महत्त्वाची आहे. एखादी नकारात्मकता आपल्याबरोबरच आपण ज्या संस्थेचे प्रतिनिधित्त्व करतो तिच्यासाठीही घातक ठरू शकते. यासाठी राष्ट्र प्रथम हे ध्यानात ठेवले पाहिजे. त्यानंतर पक्ष आणि शेवटी आपण हा विचार केला पाहिजे. तसेच राष्ट्र म्हणजे केवळ जमिनीचा टुकडा नव्हे, तर लोक आणि जनतेप्रती प्रेम आणि वात्सल्य हे राष्टीयत्व असले पाहिजे. जात धर्माच्यापलिकडे जात आपण भारतीय आहोत हे कायम ध्यानात ठेवले पाहिजे, असेही ते म्हणले.
गोवा स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न -
आपले सरकार संवेदनशील असून सर्वबाबतीत गोवा स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. त्याबरोबरच प्रवाशी भारतीयांनीही यामध्ये योगदान द्यावे, अशी मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत वक्त केले.
हेही वाचा - सिराज आणि जसप्रीतला ऑस्ट्रेलियात करावा लागला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना