ETV Bharat / city

गुळाला लागणाऱ्या मुंगळ्यांप्रमाणेच मगो सत्तेला लागणारा मुंगळा - गोविंद गावडे - महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा गुळाला लागणाऱ्या मुंगळ्यांप्रमाणे आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळातून काढून टाकले तरी अजून सत्तेची वाट पाहत त्यांनी सरकारचा पाठिंबा काढलेला नाही, अशी जोरदार टीका गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केली.

गोविंद गावडे यांची महाराष्ट्र गोमंतक पक्षावर टीका
author img

By

Published : May 25, 2019, 2:35 PM IST

पणजी - महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा गुळाला लागणाऱ्या मुंगळ्यांप्रमाणे आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळातून काढून टाकले तरी अजून सत्तेची वाट पाहत त्यांनी सरकारचा पाठिंबा काढलेला नाही, अशी जोरदार टीका गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केली. आपण केलेल्या प्रचारामुळे शिरोडा पोटनिवडणुकीत मगो पक्षाध्यक्षांना पराभव पत्करावा लागल्याचा दावाही त्यांनी केला.

गोविंद गावडे यांचा महाराष्ट्र गोमंतक पक्षावर टीका

लोकसभा निवडणुकीबरोबर दक्षिण गोव्यातील विधानसभेच्या शिरोडा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. त्यामध्ये मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना गावडे म्हणाले, प्रचाराच्या निमित्ताने १८ दिवस शिरोडा मतदारसंघात घराघरात पोहोचलो. गोवा सरकारमधील मुख्य घटकपक्ष भाजपने येथे उमेदवार जाहीर करण्यास विलंब केला. त्यामुळे प्रचाराला वेळही कमी मिळाला. तर मगो अध्यक्षांनी साडेतीन महिने आधीच प्रचाराला सुरुवात केली होती. परंतु, मी प्रचार करताना सरकार का टीकवणे आवश्यक आहे हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचा भाजप उमेदवार सुभाष शिरोडकर यांना लाभ झाला. तसेच शिरोडकर यांचे मतदारसंघातील लोकांशी असलेला संपर्क आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मोठे आहे. त्याचाही फायदा झाला.

मगोच्या ढवळीकर यांना पुन्हा सरकारमध्ये घेणार का, असे विचारले असता गावडे म्हणाले, भाजप त्यांना पुन्हा पाचारण करेल असे मला वाटत नाही. तसेच मगो संपण्याच्या मार्गावर असल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. याला कारणही मगोचे नेते आहेत. कारण ते त्याकडे प्रादेशिक पक्ष म्हणून नव्हे, तर आपल्यापुरते मर्यादित करून ठेवत आहेत.

'उटा'च्या 'आदिवासी प्रज्ञावंत'चे वितरण शनिवारी

गोव्यातील आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी युनायटेड ट्रायबल अलायन्स असोसिएशनचे (उटा) च्या ,' आदिवासी प्रज्ञावंत' पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. २५ ) सकाळी १०.३० वाजता कडुचडे येथील रवींद्र भवनमध्ये विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे. एकलाख रोख रक्कम, शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कारांची पार्श्वभूमी स्पष्ट करताना मंत्री गावडे म्हणाले, २००८ मध्ये दक्षिण गोव्यातील बाळ्ळी येथे आपल्या हक्कांसाठी लढताना दिलीप वेळीप आणि मंगेश गांवकर हे हुतात्मा झाले. गोव्यातील आदिवासी लोकांसाठी हा प्रेरणा दिवस आहे. शिक्षण, खेळ, शेती आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी हा पुरस्कार दिला जातो. यासाठी यावर्षी रवींद्र गांवकर (शिक्षण), जयंती वेळीप (क्रीडा), दत्ताराम जल्मी (शेती) आणि अमेलिया डायस (सांस्कृतिक) यांची निवड करण्यात आली आहे.

Intro:पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा गुळाला लागणाऱ्या मुंगळ्या प्रमाणे आहे. त्यामुळे मंत्रीमंडळातून काढून टाकले तरी अजून सत्तेची वाट पाहता सरकारचा पाठिंबा काढरेला नाही, अशी जोरदार टीका गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आज येथे केली. आपण केलेल्या प्रचारामुळे शिरोडा पोटनिवडणुकीत मगो पक्षाध्यक्षांना पराभव पत्करावा लागल्याचा दावाही त्यांनी केला.

Body:लोकसभा निवडणुकीबरोबर दक्षिण गोव्यातील विधानसभेच्या शिरोडा मतादारसंघात पोटनिवडणूक झाली होती. त्यामध्ये मगो औौअध्यक्ष दीपक ढवळीकर यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.
याविषयी गावडे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, प्रचाराच्या निमित्ताने 18 दिवस शिरोडा मतदारसंघात घराघरांत पोहोचलो. गोवा सरकारमधील मुख्य घटकपक्ष भाजपने येथे उमेदवार जाहीर करण्यास विलंब केला. त्यामुळे प्रचाराला वेळही कमी मिळाला. तर मगो अध्यक्षांनी साडेतीन महिने आधीच प्रचाराला सुरुवात केली होती. परंतु, मी प्रचार करताना सरकार का टीकवणे आवश्यक आहे. हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचा भाजप उमेदवार सुभाष शिरोडकर यांना लाभ झाला. तसेच शिरोडकर यांचे मतदारसंघातील लोकांशी असलेला संपर्क आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मोठे आहे. त्याचा फायदा झाला.
मगोच्या ढवळीकर यांना पुन्हा सरकारमध्ये घेणार का असे विचारले असता गावडे म्हणाले, मला वाटत नाही, की भाजप त्यांना पुन्हा पाचारण करेल म्हणून. तसेच मगो संपण्याच्या मार्गावर असल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. याला कारणही मगोचे नेते आहे. जे त्याकडे प्रादेशिक पक्ष म्हणून नव्हे तर आपल्या पुरते मर्यादित करून ठेवत आहेत.
'उटा' च्या 'आदिवासी प्रज्ञावंत' चे वितरण शनिवारी
गोव्यातील आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी युनायटेड ट्रायबल अलायन्स असोसिएशनचे (उटा) च्या ,' आदिवासी प्रज्ञावंत' पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि.25) सकाळी 10.30 वाजता कडुचडे येथील रवींद्र भवनमध्ये विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे. रोख रूपये एकलाख, शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कारांची पार्श्वभूमी स्पष्ट करताना मंत्री गावडे म्हणाले, 2008 मध्ये दक्षिण गोव्यातील बाळ्ळी येथे आपल्या हक्कांसाठी लढताना दिलीप वेळीप आणि मंगेश गांवकर हे शहीद झाले. त्याची गोव्यातील आदिवासी लोकासाठी हा प्रेरणा दिवस' आहे. शिक्षण, खेळ, शेती आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी हा पुरस्कार। दिला जातो. यासाठी यावर्षी रवींद्र गांवकर (शिक्षण), जयंती वेळीप (क्रीडा), दत्ताराम जल्मी (शेती) आणि अमेलिया डायस (सांस्कृतिक) यांची निवड करण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.