पणजी (गोवा) - डिचोली येथील रुपल गोसावी ही विद्यार्थिनी आज युक्रेनमधून दिल्ली येथे सुखरूप ( goa student came back from Ukraine ) पोचली. गोवा सदनचे निवासी आयुक्त विकास कांबळे यांनी तिचे इंदिरा गांधी विमानतळ, येथे पुष्पगुच्छ, देऊन स्वागत केले. त्यांनी तिची प्रकृती आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या इतर गोव्याच्या विद्यार्थ्यांचीही चौकशी केली. रुपल गोसावी ही युक्रेनमध्ये शिकत होती. रशिया आणि युक्रेनमध्ये अद्यापही युद्धसदृश परिस्थिती आहे.

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण -
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अद्याप युक्रेनमध्ये असलेल्या मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत सरकार सर्वतोपरी मुलांना वापस आणण्याचे काम करत आहे. मात्र आज आलेल्या या बातमीमुळे पालकांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण वाढले आहे.