ETV Bharat / city

गोव्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी 22 मार्चला निवडणूक; तर 23 मार्चला मतमोजणी - goa panchayat samiti elections

उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींची निवडणूक येत्या 22 मार्चला होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत केली आहे. तपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाणार आहे. तसेच आजपासून संपूर्ण गोव्यासाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

goa panchayat elections
गोव्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी 22 मार्चला निवडणूक होणार
author img

By

Published : Feb 21, 2020, 8:20 PM IST

पणजी - उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींची निवडणूक येत्या 22 मार्चला होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत केली आहे. जिल्हा परिषदेच्या 50 जागांमधील 31 जागा आरक्षित, तर 29 जागा अनारक्षित असून सुमारे आठ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाणार आहे. तसेच आजपासून संपूर्ण गोव्यासाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

गोव्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी 22 मार्चला निवडणूक होणार
राज्य निवडणूक आयुक्त आर.के. श्रीवास्तव यांनी आज संबंधित घोषणा केली असून पंचायत सचिव मेलविन वाझ, ओएसडी डॉ.वाय.दुर्गाप्रसाद, गुरुदास देसाई आणि नोडल अधिकारी सागर गुरव, आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. एकाच वेळी दोन्ही जिल्हापंचायतींसाठी 22 मार्चला सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत मतदान प्रक्रिया पाकर पडणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. तर दुसऱ्या दिवशी 23 मार्चला मतमोजणी होणार आहे.

या जिल्हापंचायतींचा कार्यकाळ 18 मार्च 2025 पर्यंत असणार आहे. यंदा 31 मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अनूसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 6, इतर मागासवर्ग 14 आणि काही मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत. या निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती 2 टक्के, अनुसूचित जमाती 12 टक्के, इतर मागासवर्गीय 28 टक्के असे प्रमाण आहे. यासाठी 15 ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. उत्तर गोव्यासाठी 6 तर दक्षिण गोव्यासाठी 9 अधिकारी असून उपजिल्हाधिकारी हेच निवडणूक निर्णय अधिकारी असतील, असे आयुक्त म्हणाले.

तर मामलेदार साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. यासाठी उमेदवारांना 5 लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे. सर्वसाधारण उमेदवारांना 500 रुपये, तर महिला आणि अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय उमेदवारांना 300 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. मतदान पक्ष चिन्हावर होणार असून मतपत्रिकेवर मतदान होणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आल्याचे निवडणूक आयुक्त आर.के. श्रीवास्तव यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम
दि. 27 फेब्रुवारी ते 5 मार्च - अर्ज सादर करणे
दि. 6 मार्च - अर्जांची छाननी
दि. 7 मार्च - अर्ज मागे घेणे
दि. 22 मार्च - सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान
दि. 23 मार्च - मतमोजणी

मतदार - एकूण - 8,29,896
उत्तर गोवा 4, 18, 225 (पुरुष- 2,04,230; महिला- 2,13, 995)
दक्षिण गोवा - 4,11,651 (पुरुष- 2,00,041; महिला- 2,11,610)

सर्वाधिक मतदार - उत्तर गोवा - सुकूर (22,505 मतदार), दक्षिण गोवा - सांखवाळ (23,286 मतदार)
सर्वात कमी मतदार - उत्तर गोवा - पाळी (14,196 मतदार), दक्षिण गोवा- ऊसगाव-गांजे (11, 344 मतदार)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.