ETV Bharat / city

नाफ्ता जहाज रिकामे करण्यासाठी सिंगापूर स्थित कंपनीची घेणार मदत

'नू-शी-नलिनी' जहाजातील नाफ्ता (रसायन) बाहेर काढण्यासाठी ज्यांना काम दिले होते त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आम्हाला यामध्ये प्रयोग करायचे नाहीत. कोणत्याही प्रकारची हानी न होता संबंधित जहाजातील नाफ्ता हलविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, असे डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

नाफ्ता जहाज रिकामे करण्यासाठी सिंगापूर स्थित कंपनीची घेणार मदत
author img

By

Published : Nov 5, 2019, 7:56 PM IST

पणजी - नाफ्ताने भरलेले जहाज दोनापावल येथील समुद्रात अडकलेले आहे. ते रिकामे करण्यासाठी सिंगापूर स्थित कंपनीची मदत घेतली जाणार आहे. यासाठी दोन कंपन्यांनी पाहणी करून 'कोटेशन' दिले आहे. दोन दिवसात कार्यवाही सुरु होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंगळवारी 'महालक्ष्मी' या सरकारी निवासस्थानी दिली. गोव्यात सध्या वेगाने घडणाऱ्या विविध घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आणि भाजप आमदारांना याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बैठक बोलावली होती. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

नाफ्ता जहाज रिकामे करण्यासाठी सिंगापूर स्थित कंपनीची घेणार मदत

डॉ. सावंत म्हणाले, यापूर्वी 'नू-शी-नलिनी' जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्यासाठी ज्यांना काम दिले होते त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आम्हाला यामध्ये प्रयोग करायचे नाहीत. कोणत्याही प्रकारची हानी न होता संबंधित जहाजातील नाफ्ता हलविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सिंगापूर स्थित अनुभवी ३ कंपन्यांना पाचारण केले होते. मात्र, दोन कंपन्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून 'कोटेशन' सादर केले आहे. आज ते उघडल्यानंतर उद्यापासून काम दिले जाईल. येथे उपलब्ध साहित्याने शक्य झाले तर आठ दिवसात काम पूर्ण होईल. पण बाहेरून मदत आणावी लागली, तर 15 दिवस लागतील. जहाज सुरक्षित असून त्यामधील टँकर भरलेल्या नाफ्त्यासाठी नायट्रोजन आवश्यक प्रमाणात आहे. त्यामुळे भीतीचे कारण नाही.

हे वाचलं का? - नाफ्ता भरलेले जहाज हलवण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीच हालचाल नाही

केंद्रीय गृहमंत्रालय आणि जहाज बांधणी मंत्रालयाला कळविले आहे. यासाठी गोवा सरकार खर्च करणार नसून जहाजाच्या मालकाकडून वसूल केला जाईल. त्याने न दिल्यास मुरगाव पत्तन न्यासाला (एमपीटी) द्यावा लागेल.

इंजिनरहित आणि ज्वालाग्राही पदार्थ भरलेले जहाज मुरगाव बंदरात आणण्यासाठी परवानगी दिल्याच्या कारणाने एमपीटी अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याचे काय झाले? असे विचारले. त्यावेळी सावंत म्हणाले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. मात्र, सध्या त्यांची मदत घेऊन ही अडचण दूर करावी लागणार आहे. कारण त्यांना अटक झाली तर काम लांबण्याची शक्यता आहे. तसेच जहाज मालक आणि त्याचा कप्तान देश सोडून जाऊ नये यासाठी दोघांचेही पासपोर्ट (पारपत्र) जप्त करण्यात आले आहेत. गुन्हेगारांवर देखील कारवाई केली जाणार आहे.

Intro:पणजी : नाफ्ताने भरलेले जहाज दोनापावल येथील समुद्रात अडकलेले आहे. ते रिकामी करून हालविण्यासाठी सिंगापूर स्थित कंपनीची मदत घेतली जाणार आहे. यासाठी दोन कंपन्यांनी पाहणी करून ' कोटेशन' दिले आहे. दोन दिवसांत कार्यवाही सुरु होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज ' महालक्ष्मी' या सरकारी निवासस्थानी दिली.

Body:गोव्यात सध्या वेगाने घडणाऱ्या विविध घडामोडींचा आढावा घेत भाजप आमदारांना याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी बैठक बोलावली होती. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
डॉ. सावंत म्हणाले, यापूर्वी नू शी नलिनी जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्यासाठी ज्यांना काम दिले होते त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आम्हाला यामध्ये प्रयोग करायचे नाहीत. तर कोणत्याही प्रकारची हानी न होता सदर जहाजातील नाफ्ता. हालविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळे तज्ञांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सिंगापूर स्थित अनुभवी तीन कंपन्यांना पाणारण केले होते. परंतु, दोन कंपन्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून 'कोटेशन' सादर केले आहे. कारण ही आणीबाणीची परिस्थिती असल्याने निविदा मागविण्यात वेळ घालवायचा नाही. आज ते उघडल्यानंतर उद्यापासून काम दिले जाईल. जर येथे उपलब्ध साहित्याने शक्य झाले तर आठ दिवसांत काम पूर्ण होईल. पण जर बाहेरून मदत आणावी लागली तर 15 दिवस लागतील. जहाज सुरक्षित असून त्यामधील टँकर भरलेला नाफ्त्यासाठी नायट्रोजन आवश्यक प्रमाणात आहे. त्यामुळे भीतीचे कारण नाही.
केंद्रीय ग्रूहमंत्रालय आणि जहाज बांधणी मंत्रालयाला कळविले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, यासाठी गोवा सरकार खर्च करणार नसून जहाजाच्या मालकाकडून वसूल केला जाईल. त्याने न दिल्यास मुरगाव पत्तन न्यासाला (एमपीटी) द्यावा लागेल.
इंजिनरहित आणि ज्वालाग्राही पदार्थ भरलेले जहाज मुरगाव बंदरात आणण्यासाठी परवानगी दिल्याच्या कारणाणने एमपीटी अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याचे काय झाले, असे विचारले असता, सावंत म्हणाले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. परंतु, सध्या त्यांची मदत घेऊन ही अडचण दूर करावी लागणार आहे. कारण जर त्यांना अटक झाली तर काम लांबण्याची शक्यता आहे. तसेच जहाज मालक आणि त्याचा कप्तान देश सोडून जाऊ नये यासाठी दोघांचेही पासपोर्ट (पारपत्र) जप्त करण्यात आले आहेत. गुन्हेगारांवर मागावून कारवाई केली जाणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.