ETV Bharat / city

Goa Congress Candidates Oath : गोव्यात राहुल गांधींनी काँग्रेस उमेदवारांना दिली पक्ष न सोडण्याची शपथ - गोवा काँग्रेस उमेदवारांना शपथ

गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) प्रचाराला आता वेग आला आहे. निवडून आल्यावर आमदार फुटून दुसऱ्या पक्षात जाऊ नये यासाठी सर्व उमेदवारांना आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत शपथ देण्यात (Congress Candidate Oath of loyalty) आली.

Goa Congress Candidates Oath
राहुल गांधींनी दिली काँग्रेस उमेदवारांना शपथ
author img

By

Published : Feb 4, 2022, 6:23 PM IST

Updated : Feb 4, 2022, 7:17 PM IST

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) प्रचाराला आता वेग आला आहे. निवडून आल्यावर आमदार फुटून दुसऱ्या पक्षात जाऊ नये यासाठी सर्व उमेदवारांना आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत शपथ देण्यात (Congress Candidate Oath of loyalty) आली. गोवा इंटरनॅशनल सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रत्येक उमेदवाराला ही शपथ देण्यात आली. याआधी काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना पणजीत महालक्ष्मी मंदिरात पक्ष न सोडण्याची छपथ दिली होती.

राहुल गांधींनी दिली काँग्रेस उमेदवारांना शपथ
  • काँग्रेस, 'आप'ने दिली उमेदवारांना शपथ -

गोवा निवडणूक जसजशी जवळ येईल तशी या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात उड्या मारणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आपला गड ढासळण्याची धास्ती सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे. गोव्यात काँग्रेसने भाजपला लागलेली गळती पाहून लगेच सावध पवित्रा घेतला आणि आपल्या उमेदवारांना पक्ष न बदलण्याच्या शपथा दिल्या होत्या. त्यानंतर गोव्यात आम आदमी पार्टीनेही काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकत, आपल्या सर्व उमेदवारांना न फूटण्याची शपथ दिली. तसेच सर्व उमेदवारांच्या कायदेशीर प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्याचीही माहिती आम आदमी पार्टीकडून देण्यात आली आहे. त्यानंतर आज (4 फेबु्वारी) निवडून आल्यावर आमदार फुटून दुसऱ्या पक्षात जाऊ नये यासाठी सर्व काँग्रेसच्या उमेदवारांना राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शपथ देण्यात आली.

  • 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात -

गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) साठी बिगुल वाजले आहेत. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या जुन्या पक्षांसोबतच टीएमसी, आरजीपी, जय महाभारत पार्टी, गोएंचो स्वाभिमान पक्ष आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गोवा विधानसभा निवडणूक 2022 साठी व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार (Goa to vote on February 14) आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळणार आहे.

Last Updated : Feb 4, 2022, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.