पणजी (गोवा) - महाराष्ट्र राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना गोव्यातही काँग्रेसने आपल्या आमदारांना दिल्लीत बोलावून घेतले आहे. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह काँग्रेसचे सहा आमदार राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झालेत.
मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उत आला होता. त्यातच भाजपचे निवडणूक प्रभारी सिटी रवी यांनी काँग्रेसचे अनेक नेते आमदार आपल्या संपर्कात असल्याचे विधान भाजपच्या एका जाहीर कार्यक्रमात केला होते. त्यामुळेच अस्वस्थ झालेल्या काँग्रेसच्या काही आमदारांना राहुल गांधी यांनी दिल्लीत बोलावून घेतले आहे. या संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, युरी आलेमाव, कार्लोस आलमेडा, अल्टोन दी कॉस्ता आणि रुदलफ फर्नांडिस या आमदारांचा समावेश आहे. काही आमदार मागच्या काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते तसेच त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती.